पर्यटकांना आणण्यास गेलेल्या टेम्पो ट्रॅव्हलर्स चालकाला मारहाण

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
3 hours ago
पर्यटकांना आणण्यास गेलेल्या टेम्पो ट्रॅव्हलर्स चालकाला मारहाण

मडगाव : उत्तोर्डा येथील एका हॉटेलमधील पर्यटकाने टेम्पो ट्रॅव्हलर्सची बुकींग केली होती. या पर्यटकांना आणण्यासाठी गेलेल्या चालक मोहम्मद कगेनल्ली याला स्थानिक टॅक्सी चालक अरुण नाईक व इतरांनी अडवून मारहाण केली. याप्रकरणी वेर्णा पोलिसांत तक्रार नोंद करण्यात आली आहे.

उत्तोर्डा येथील हॉटेलमधील पर्यटक आदित्य रेमाणी यांनी कांदोळी येथे जाण्यासाठी टेम्पो ट्रॅव्हलर्स बुकींग केली होती. पर्यटकांना आणण्यासाठी टेम्पो ट्रॅव्हलर्स घेऊन हॉटेलकडे गेल्यावर चालक मोहम्मद कगेनल्ली याला अरुण नाईक याने अडवले. या हॉटेलमधून पर्यटकांना नेण्यास देणार नाही, असे सांगितले. त्यानंतर इतरही चालकांनी एकत्र येत गाडी अडवली. मोबाईलमध्ये व्हिडीओ काढत असल्याचे पाहून त्यांनी गाडीत प्रवेश करत मोबाईल काढून घेतला. त्यानंतर क्लिप डिलिट करत मोबाईल परत केला. त्यावेळी शिवीगाळ करत मारहाणही केली. याप्रकरणी कोलवा पोलिसांना कळवण्यात आले. पोलीस घटनास्थळी आले.त्यानंतर वेर्णा येथील पोलीस ठाण्यात चालकाला नेण्यात आले. याप्रकरणी वेर्णा पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे. 

हेही वाचा