कपिलेश्वरी-कवळे येथे गुरांना वाचविण्याच्या प्रयत्नात कंटेनरला अपघात

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
29th September, 11:51 pm
कपिलेश्वरी-कवळे येथे गुरांना वाचविण्याच्या प्रयत्नात कंटेनरला अपघात

फोंडा : कपिलेश्वरी-कवळे येथील उड्डाणपुलावर शनिवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास रस्त्यावरील गुरांना वाचविण्याच्या नादात कंटेनरला अपघात झाला. अपघातात कंटेनर चालक सुखरूप बचावला. अपघातात कंटेनरचे नुकसान झाले.

प्राप्त माहितीनुसार, एनएल-०१-क्यू - ०१८६ क्रमांकाचा कंटेनर कुंडई येथून गुवाहाटी येथे जात होता. उड्डाणपुलावर अचानक गुरे रस्त्यावर आल्याने चालकाने ब्रेक लावून कंटेनर थांबविण्याचा प्रयत्न केला. पण अचानक ब्रेक लागला नसल्याने कंटेनरची दुभाजकाला धडक बसली. यात कंटेनर चालक सुखरूप बचावला. अपघाताची माहिती मिळाल्यावर फोंडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला आहे. 

हेही वाचा