आज घेणार मान्सून निरोप

राज्यात आतापर्यंत १७३.२५ इंच पाऊस

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
29th September, 11:34 pm
आज घेणार मान्सून निरोप

पणजी : आतापर्यंत मान्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा ४६.७ टक्के जास्त असूनही जून, जुलै आणि ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमधील पाऊस कमी पडला आहे. सोमवारी मान्सूनचा शेवटचा दिवस असून आतापर्यंत १७३.२५ इंच पाऊस झाला आहे.
सप्टेंबरमध्ये १८.७४ इंच पावसाची नोंद झाली आहे. जून, जुलै आणि ऑगस्टच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे.मान्सूनचा पाऊस जून ते सप्टेंबरपर्यंत असतो. सप्टेंबरनंतर अवकाळी पावसाला सुरुवात होते. आतापर्यंत जूनमध्ये ३६.९९ इंच, जुलैमध्ये ७९.३१ इंच, ऑगस्टमध्ये ३८.२१ इंच आणि सप्टेंबरमध्ये १८.७४ इंच पावसाची नोंद झाली आहे. जुलैमध्ये दररोज पाऊस पडत होता. गेल्या २४ तासात केवळ १.७ इंच पावसाची नोंद झाली आहे. हवामान खात्याने सोमवारी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीतील पावसाचा विचार करता, ८ जुलै रोजी सर्वाधिक २३५ मिमी (९.२५ इंच) पावसाची नोंद झाली. ८ जुलै रोजी पणजीमध्ये ३६३ मिमी (१४.२९ इंच) पावसाची नोंद झाली. जुलैमध्ये नऊ रेड अलर्ट जारी करण्यात आले होते.सप्टेंबरचा विचार केला तर सप्टेंबरमध्ये ९२.१ मिमी (३.६२ इंच) पावसाची नोंद झाली. ५ ठिकाणी पावसाने १७५ इंच ओलांडले.पेडणे, साखळी, वाळपई, सांगे आणि केपे या पाच ठिकाणी १७५ इंचांपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. दाबोळी केंद्र वगळता सर्व ठिकाणी १५० इंचांपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.
एकूण पावसाची नोंद
म्हापसा - १५७.६३ इंच (४००४ मिमी)
पेडणे - १७९.१३ इंच (४५५० मिमी)
फोंडा - १७०.१५ इंच (४३२२ मिमी)
पणजी - १६०.११ इंच (४०६७ मिमी)
जूने गोवे-१६८.३० इंच (४२७५ मिमी)
साखळी - १८६.८१ इंच (४७७५ मिमी)
वाळपई -२१७ इंच (५५३६ मिमी)
काणकोण - १६७.४० इंच (४२५२ मिमी)
दाबोळी - ३५१२ इंच (४१५० मिमी)
मडगाव - १५९.२९ इंच (४०४६ मिमी)
मुरगाव - १५३ इंच (३८८६ मिमी)
केपे - १८६.४५ इंच (४७३६ मिमी)
सांगे-२१४.०५ इंच (५४३७ मिमी)