साखळीतील युवतीला १९ लाखांचा गंडा घालणाऱ्यास साताऱ्यातून अटक

डिचोली पोलिसांची कारवाई : अधिक पैसे मिळवून देण्याचे दिले हाेते आश्वासन

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
29th September, 06:59 pm
साखळीतील युवतीला १९ लाखांचा गंडा घालणाऱ्यास साताऱ्यातून अटक

डिचोली : पाळी साखळी येथील युवतीला अधिक पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून सुमारे १९ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी डिचोली पोलिसांनी एका कारवाईत महाराष्ट्रातील सातारा येथून साई सुनील दळवी याला ताब्यात घेतले असून त्याला अटक केली आहे.

पाळी साखळी येथील सोनाली गावस या युवतीने डिचोली पोलिसांत तक्रार नोंदवताना १८ लाख ९९ हजार ८४० रुपये लुटल्याची तक्रार पोलिसात नोंदवली होती. पोलिसांनी तक्रारीची दखल घेताना या संदर्भात गुन्हा नोंद करून तपास केला होता. विविध माध्यमातून पोलिसांनी तपास करताना फसवणूक केल्याप्रकरणी सातारा येथून साई सुनील दळवी याला ताब्यात घेतले. त्याला अटक करून पुढील तपास करण्यात येत आहे.

उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक अक्षत कौशल, पोलीस उपअधीक्षक सागर एकोस्कर, पोलीस निरीक्षक दिनेश गडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुनील पाटील व पोलीस पथकाने ही कारवाई केली. 

या व्यक्तीविरुद्ध काही पोलीस ठाण्यांत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. त्यामुळे त्याची इतर ठिकाणीही चौकशी करण्यात येणार असून फसवणुकीसंदर्भात अधिक माहिती समोर येणार आहे.


हेही वाचा