कोलवाळमध्ये २ लाखांचे ड्रग्स जप्त

संशयित आरोपी स्टिफन मायकल पॉल यास अटक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
29th September, 12:05 am
कोलवाळमध्ये २ लाखांचे ड्रग्स जप्त

म्हापसा : कोलवाळ येथील बिनानी कंपनीजवळील उड्डाण पुलाच्या खाली गुन्हा शाखेने छापा टाकून एमडीएमए व एम्फेटामाई या ड्रग्ससह इतर वस्तू मिळून ३ लाखांचा माल जप्त केला. तसेच संशयित आरोपी स्टिफन मायकल पॉल (२१, रा. चिखली, कोलवाळ) यास अटक केली.

ही कारवाई पोलिसांनी शनिवारी पहाटे २.३० ते ५ या कालावधीत केली. घटनास्थळी ड्रग्सचा विक्री व्यवहार होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार हा छापा टाकण्यात आला.

संशयित आरोपी घटनास्थळी येताच सापळा रचत पोलिसांनी त्याला पकडले. झडतीवेळी संशयिताजवळ ६.७३३ ग्रॅम वजनाचा एमडीएमए व ५.४७५ ग्रॅम वजनाचा एम्फेटामाईन हा सुमारे २ लाखांचा ड्रग्स सापडला.

तसेच संशयिताकडून जीए ०३ क्यू ६४२२ क्रमांकाची मोटारसायकल व मोबाईल फोन मिळून एकूण ३ लाखांचा माल पोलिसांनी जप्त केला.

पोलीस अधीक्षक राहूल गुप्ता, उपअधीक्षक राजेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विकास देयकर, सहाय्यक उपनिरीक्षक श्रीराम साळगावकर, हवालदार अशोक गावडे, इर्शाद वाटांगी, कॉन्सटेबल महाबळेश्वर सावंत, विनायक सावंत व रूपेश गायकवाड या पथकाने ही कामगिरी केली.                           

हेही वाचा