वेर्णा आयडीसीत भूमिगत वीजवाहिन्यांच्या कामावेळी गॅस वाहिनीला गळती

गॅस पुरवठा बंद करत दुरुस्ती काम सुरू

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
29th September, 12:05 am
वेर्णा आयडीसीत भूमिगत वीजवाहिन्यांच्या कामावेळी गॅस वाहिनीला गळती

मडगाव : वेर्णा आयडीसी येथील चिकित्सा इस्पितळानजीक भूमिगत वीज वाहिन्यांचे काम सुरू असताना अदानीच्या नॅचरल गॅस पाईपलाइनला तडा गेला. मात्र कंपनीकडून वाहिनीतून होणारा गॅसपुरवठा तातडीने बंद करण्यात आला व त्यानंतर दुरुस्ती काम हाती घेण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.

अग्निशामक दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, वेर्णा अग्निशामक दलाला सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास गॅस वाहिनीतून गळती होत असल्याचे सांगण्यात आले. घटनास्थळी जात पाहणी केली असता, वेर्णा औद्योगिक वसाहतीतील चिकित्सा इस्पितळानजीक भूमिगत वीज वाहिन्यांचे काम सुरू होते.

त्या खोदकामावेळी अदानी कंपनीच्या नॅचरल गॅस पुरवठा वाहिनीला धक्का बसला व गॅसची गळती सुरू झाली. गेल कंपनीच्या अधिकार्‍यांना याची माहिती दिल्यानंतर त्यांनी सदर वाहिनीतून होणारा गॅस पुरवठा बंद केला. त्यानंतर वाहिनीच्या दुरूस्तीचे काम हाती घेतले.      

हेही वाचा