राज्यातील सहकारी बँकांच्या कारभारावर आता वेबबेस अॅपद्वारे राहणार नजर

खात्याकडून महिन्याभरात होणार अंमलबजावणी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
28th September, 11:39 pm
राज्यातील सहकारी बँकांच्या कारभारावर आता वेबबेस अॅपद्वारे राहणार नजर

प्रतिनिधी। गोवन वार्ता

पणजी : राज्यातील सहकारी बँकांचा कारभार आता अधिक पारदर्शक होणार आहे. सरकारी​ बँका, सोसायट्यांच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी खात्याने वेबबेस अॅप तयार केले असून, पुढील महिनाभरात या अॅपची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती सहकार खात्यातील सूत्रांनी ‘गोवन वार्ता’शी बोलताना दिली.


गेल्या काही वर्षांत राज्यातील सहकारी बँका, सोसायट्या तसेच पंतसंस्थांमधील थकीत कर्जाचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याशिवाय काही सोसायट्यांत संचालक मंडळाकडूनच आर्थिक घोटाळा झाल्याची प्रकरणे उघडकीस आली आहेत. यावर अंकुश घालण्यासाठी वेबबेस अॅप तयार करण्याची प्रक्रिया खात्याने गेल्या काही महिन्यापासून सुरू केली होती​. हे काम ‘एनआयसी’ला देण्यात आले होते. त्यानुसार, ‘एनआयसी’ने अॅप तयार केले आहे.