संसदेच्या वाणिज्य स्थायी समितीवर सदानंद शेट तानावडे तर संरक्षण समितीवर कॅ. विरियातोंची वर्णी

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
28th September, 04:23 pm
संसदेच्या वाणिज्य स्थायी समितीवर सदानंद शेट तानावडे तर संरक्षण समितीवर कॅ. विरियातोंची वर्णी

पणजी :  वेगवेगळे विषय हाताळण्यासाठी संसदेने अनेक स्थायी समित्यांची निर्मिती केली असून यात गोव्याचे राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानावडे यांची संसदेच्या वाणिज्य स्थायी समितीच्या सदस्यपदी तर दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांची देशाच्या संरक्षण समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे. 

स्थायी समितीवर काम करण्याची संधी मिळाल्याने राज्याच्या विकासाच्या अनुषंगाने जे काही काम शक्य असेल ते केले जाईल असे तानावडे यांनी म्हटले आहे. तानावडे हे प्रथमच राज्यसभेवर निवडून आले आहेत. डोला सेन या वाणिज्य स्थायी समितीच्या अध्यक्षा आहेत. 

देशाच्या संरक्षण समितीवर दक्षिण गोव्यातील लोकसभेचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांची वर्णी लागली आहे. दरम्यान कॅप्टन विरियातोंच्या संरक्षण क्षेत्रातील २५ वर्षांच्या प्रभावी कारकीर्दीमुळेच त्यांची या समितीवर निवड झाल्याचे म्हटले जात आहे. राधा मोहन सिंह हे संरक्षण समितीचे अध्यक्ष आहेत.  

हेही वाचा