३६ पोलीस उपनिरीक्षकांसह ७०४ कर्मचाऱ्यांची बदली

गोवा पोलीस खात्यात मोठे बदल

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
27th September, 11:13 pm
३६ पोलीस उपनिरीक्षकांसह ७०४ कर्मचाऱ्यांची बदली

पणजी : पोलीस स्थापना मंडळाच्या शिफारशीनुसार गोवा पोलीस खात्यात मोठे बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार, ३६ पोलीस उपनिरीक्षकांसह ७०४ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात ७७ महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. याबाबतचा आदेश मुख्यालयाचे अधीक्षक नेल्सन आल्बुकर्क यांनी जारी केले आहेत.

जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, ३६ पोलीस उपनिरीक्षकांची बदली करण्यात आली आहे. यात ८ महिला उपनिरीक्षकांचा समावेश आहे. याशिवाय, २३ सहाय्यक उपनिरीक्षकांची बदली करण्यात आली आहे. यात २ महिला सहाय्यक उपनिरीक्षक, ६८ हवालदार असून त्यात दोन महिला हवालदारांचा समावेश आहे. याशिवाय ७० महिला पोलीस काॅन्स्टेबल, ४९७ पोलीस कॉन्स्टेबल, ३ सहाय्यक उपनिरीक्षक (बिनतारी संदेश), ४ हवालदार (आरटीओ), एक पोलीस काॅन्स्टेबल (बिनतारी संदेश) आणि दोन पोलीस काॅन्स्टेबल (आर्मरर) यांचा समावेश आहे. 

हेही वाचा