कारवारमधील विनायक नाईक खूनप्रकरणी तिन्ही संशयितांना ४ दिवसांची पोलीस कोठडी

Story: वार्ताहर। गोवन वार्ता |
27th September, 07:21 pm
कारवारमधील विनायक नाईक खूनप्रकरणी तिन्ही संशयितांना ४ दिवसांची पोलीस कोठडी

कारवार : हणकोण येथील विनायक नाईक यांच्या खूनप्रकरणी अटक केलेल्या लक्ष्य ज्योतीनाथ, अजमल तसेच असूम या तिन्ही संशयितांना चार दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी चार दिवस पोलीस कोठडी मागितली होती. त्यानुसार न्यायालयाने त्यांना चार दिवस पोलीस कोठडी दिली आहे. यावेळी लक्ष्य याची पत्नी आणि मुलगा त्याच्या जामिनासाठी कारवारच्या जिल्हा न्यायालयात आले होते.

पुण्यात व्यवसाय करणाऱ्या विनायक नाईक यांचा त्यांच्या मुळ गावी कारवार तालुक्यातील हणकोण येथे घरात घुसून २२ सप्टेंबर रोजी खून करण्यात आला होता. मुळ कारवारचा आणि गोव्यात व्यवसाय करणाऱ्या गुरुप्रसाद राणे यांच्या सुचनेनुसार हा खून करण्यात आला आहे. यावेळी विनायक नाईक यांची पत्नीही जखमी झाली आहे.

आसाम येथील लक्ष्य हा गुरुप्रसाद राणे यांचा राईटहॅन्ड म्हणून काम करीत होता. त्याने बिहारच्या अजमल आणि मासूम यांच्या सहकार्याने हा खून केला आहे. हे तिघेही कॉन्ट्रॅक्ट किलर नसून गुरुप्रसाद राणे यांच्या कंपनीत कामाला होते. त्यांनी ५०-५० हजारांसाठी हे कृत्य केले आहे. 

हेही वाचा