क्रीडा :ड्वेन ब्राव्होचा क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटला अलविदा; केकेआरच्या मेंटरपदी नियुक्ती

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
27th September, 01:51 pm
क्रीडा :ड्वेन ब्राव्होचा क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटला अलविदा; केकेआरच्या मेंटरपदी नियुक्ती

कोलकाता : वेस्ट इंडिजचा महान अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होने काल २७ सप्टेंबर गुरुवारी रात्री क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली. दुखापतीमुळे कॅरेबियन प्रीमियर लीग २०२४ मधून बाहेर पडल्यानंतर ब्राव्होने ही घोषणा केली. यापूर्वी त्याने सीपीएलच्या सुरू असलेल्या हंगामानंतर क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचे सांगितले होते. परंतु दुखापतीमुळे त्याला स्पर्धा मध्यावरच सोडावी लागली. ब्राव्होने सोशल मीडियावर एका भावनिक पोस्टद्वारे निवृत्तीची माहिती दिली. ब्राव्होने २०२१ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटला आधीच अलविदा केला होता. पण तो सातत्याने फ्रँचायझी क्रिकेटमध्ये योगदान देत होता.

Dwayne Bravo | Dwayne Bravo retires from all forms of cricket, replaces  Gautam Gambhir as Kolkata Knight Riders mentor - Telegraph India

२०२५ च्या हंगामासाठी ड्वेन ब्राव्हो केकेआरचा मेंटर 

आयपीएल २०२५ चा हंगाम अजून दूर आहे, परंतु संघांनी तयारी सुरू केली आहे. दरम्यान, बीसीसीआयकडून लवकरच रिटेनशन पॉलिसी जारी करण्यात येईल.  यादरम्यान केकेआरने ड्वेन ब्राव्होची मेंटरशिपपदी नियुक्ती केली आहे. त्याच्यावर माजी मेंटर गंभीरने केलेल्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा दबाव असेल. 

West Indies legend Dwayne Bravo retires from all forms of cricket; joins  IPL franchise KKR as mentor

ड्वेन ब्राव्होच्या टी२०  क्रिकेट कारकिर्दीवर नजर टाकली तर, ब्राव्होने २००६ पासून या फॉरमॅटमध्ये खेळायला सुरुवात केली आणि त्याची कारकीर्द २०२४ पर्यंत टिकली. दरम्यान त्याने अनेक ट्रॉफीज जिंकल्या आहेत. त्यासोबतच काही अविश्वसनीय विक्रमही आपल्या नावावर केले. ब्राव्होने ५८२ सामन्यात ६३१ विकेट घेतल्या आहेत. याशिवाय फलंदाजीत ६९७० धावा केल्या.

Dwayne Bravo retires from all forms of cricket; set to join IPL team KKR as  mentor

४० वर्षीय ड्वेन ब्राव्हो हा टी२० क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एक आहे आणि या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. त्याने अलीकडेच कोचिंगच्या भूमिकेकडे लक्ष देण्यास सुरुवात केली होती. गेल्या वर्षी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि यावर्षी टी२० वर्ल्ड कपमध्ये तो अफगाणिस्तानच्या कोचिंग स्टाफमध्ये होता.

Dwayne Bravo makes a big statement on MS Dhoni - Crictoday