कानपूर कसोटीवर पावसाचे सावट

भारत-बांगलादेश दुसरा कसोटी सामना आजपासून : पहिल्या दिवशी ९३ टक्के पाऊस शक्य

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
26th September, 11:53 pm
कानपूर कसोटीवर पावसाचे सावट

कानपूर : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना २७ सप्टेंबर रोजी कानपूर येथे खेळवला जाईल. भारतीय संघाने मालिकेतील पहिला सामना जिंकला असून १-० ने आघाडीवर आहे. दरम्यान, कानपूरमधील कसोटीच्या पहिल्या तीन दिवसात पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. कसोटीच्या पहिल्या दिवशी म्हणजे २७ सप्टेंबरला ९३ टक्के पावसाची शक्यता आहे. दिवसभर पाऊस अपेक्षित आहे, जो संध्याकाळपर्यंत आणखी तीव्र होईल. कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी २८ तारखेला ८० टक्के पावसाची शक्यता दर्शविण्यात आली. दरम्यान, तिसऱ्या दिवशी ५९ टक्के पावसाची शक्यता आहे. अखेरच्या दोन्ही दिवशी हवामान स्वच्छ असेल तर पावसाची शक्यता फारच कमी आहे.
भारतीय संघाने पहिला कसोटी सामना २८० धावांनी जिंकला होता. भारतीय संघ आता दुसरा कसोटी सामना जिंकून मालिका क्लीन स्वीप करण्याच्या निर्धारासह उतरणार आहे. अश्विनने पहिल्या कसोटीत चमकदार कामगिरी केली होती आणि सामनावीराचा किताब पटकावण्यात तो यशस्वी ठरला होता.
भारत आणि बांगलादेश यांच्यात आतापर्यंत १४ कसोटी सामने झाले असून त्यात भारतीय संघाने १२ सामने जिंकले आहेत. बांगलादेश संघाला एकही सामना जिंकता आलेला नाही. दोन्ही संघांमधील दोन सामने अनिर्णित राहिले.भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटीत कानपूरच्या ग्रीन पार्कमधील खेळपट्टी वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटूंसाठी संतुलन राखणारी असेल अशी अपेक्षा आहे. सामन्याच्या सुरूवातीला ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना आणि सामना जसा पुढे सरकत जाईल तशी फिरकीपटूंना मदत करेल. पृष्ठभाग हा पहिल्या दोन सत्रात वेगवान गोलंदाजांना चांगली उसळी आणि हालचालीसह मदत करेल. तर सामन्याच्या तिसऱ्या दिवशी खेळपट्टीवर फिरकीपटू सामन्यात पुनरागमन करतील अशी अपेक्षा आहे. ग्रीन पार्कची खेळपट्टी, उन्नाव जवळील काली मिट्टी गावातील काळ्या मातीपासून बनवलेली आहे, जी विशेषत: कसोटी सामन्याच्या शेवटच्या टप्प्यात फिरकीपटूंसाठी अनुकूल म्हणून ओळखली जाते.भारत वि बांगलादेश लाईव्ह स्ट्रीमिंग
भारत वि बांगलादेश मालिकेतील दुसरा कसोटी सामना २७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबरदरम्यान खेळवला जाणार आहे. या कसोटी सामन्याचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स १८ या चॅनेलवर होणार आहे. तर जिओ सिनेमा या मोबाईल अॅपवर आणि वेबसाईटवर या सामन्याचे लाईव्ह टेलिकास्ट होणार आहे.भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मो.सिराज, आकाश दीप, यश दयाल.
बांगलादेश संघ: नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), शकीब अल हसन, महमुदुल हसन जॉय, झाकीर हसन, शादमान इस्लाम, मेहदी हसन मिराझ, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), लिटन कुमार दास (यष्टीरक्षक), तैजुल इस्लाम, नईम हसन , हसन महमूद , तस्किन अहमद , नाहिद राणा, सय्यद खालेद अहमद, जाकेर अली अनिक.
शकिब अल हसनची निवृत्तीची घोषणा
बांगलादेश क्रिकेट संघाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू शकिब अल हसनने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या एक दिवस आधी त्याने ही घोषणा केली. या दोन्ही देशांमधील दुसरा कसोटी सामना २७ सप्टेंबरपासून कानपूरमध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी


शाकिबची निवृत्तीची घोषणा

भारताविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत शाकिबने घोषणा करत सांगितले की, तो या वर्षी मीरपूरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याच्या कसोटी क्रिकेट कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळणार आहे. कसोटी फॉरमॅटमधून निवृत्ती घेण्याबरोबरच, त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनही निवृत्ती जाहीर केली.शाकिब अल हसनने २०२४ च्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशकडून शेवटचा टी-२० सामना खेळला होता. म्हणजेच टी-२० मधून निवृत्ती घेतल्यानंतर तो भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत खेळणार नाही. तो म्हणाला की मी माझा शेवटचा टी-२० सामना खेळलाे आहे आणि मी माझ्या टी-२० कारकिर्दीबद्दल क्रिकेट बोर्डाशी बोललो आहे आणि टी २० वर्ल्ड कप २०२६ लक्षात घेऊन, आता पुढे जाण्यासाठी योग्य वेळ असेल.
कानपूरमधील दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत तो म्हणाला की, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मीरपूर येथे होणारा कसोटी सामना असेल, मी मीरपूरमध्ये शेवटचा कसोटी सामना खेळू इच्छितो, पण तसे झाले नाही तर भारताविरुद्धची ही कसोटी माझा शेवटचा कसोटी सामना असू शकतो.
शकिब अल हसन टी-२० आणि कसोटी कारकिर्द
शाकिब अल हसनने बांगलादेशसाठी आतापर्यंत ७० कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ५ शतकांच्या मदतीने ४६०० धावा केल्या आहेत, तर सर्वोत्तम धावसंख्या २१७ धावा आहे, तर १२९ टी-२० सामन्यांमध्ये त्याने २५५१ धावा केल्या आहेत आणि त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. ८४ धावा केल्या आहेत. शाकिब अल हसनने आतापर्यंत ७० कसोटी सामन्यात २४२ विकेट्स घेतल्या आहेत तर १२९ सामन्यात १४९ विकेट घेतले आहेत.