कमाईत ‘पुष्पा’ मोडणार ‘आरआरआर’चा विक्रम?

|
09th March 2023, 11:03 Hrs
कमाईत ‘पुष्पा’ मोडणार ‘आरआरआर’चा विक्रम?

पुष्पा या चित्रपटाची क्रेझ अजूनही लोकांच्या डोक्यात आहे. अशा परिस्थितीत, चाहते अल्लू अर्जुन स्टारर ‘पुष्पा: द राइज’ची आतुरतेने वाट पाहत आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या चित्रपटाने रिलीज होण्यापूर्वीच बक्कळ कमाई केली आहे. या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत एसएस राजामौली यांच्या आरआरआर चित्रपटालाही मागे टाकले आहे.
पुष्पा २ चे निर्माते थिएटर हक्कांसाठी १००० कोटींची मागणी करत आहेत. तमिळ, कन्नड आणि मल्याळम डब व्हर्जन्सची अशी क्रेझ नाही. चाहत्यांनी काळजी करण्याची गरज नाही, कारण हिंदी आणि तेलुगू आवृत्त्यांबद्दल चर्चा मजबूत आहे, आणि एसएस राजामौलींच्या ‘आरआरआर’ पेक्षा हा चित्रपट अधिक चांगला करेल अशी अपेक्षा आहे. याच्या थिएटरच्या हक्कातून निर्मात्यांना ९०० कोटी रुपये मिळाले असल्याच्या चर्चा आहेत.
सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा’ हा एक व्यावसायिक यशस्वी सिनेमा होता. याने जगभरात ३५० कोटींहून अधिक कमाई केली. फक्त त्याच्या हिंदी व्हर्जनने १०० कोटींहून अधिक कमाई केली होती. इंडस्ट्रीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुष्पाचा सिक्वेल चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे आणि चाहते त्याच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. थिएटर हक्क कराराची खरी आकडेवारी अद्याप समोर आलेली नसली तरी या अफवांमुळे चाहत्यांच्या उत्साहाला उधाण आले आहे.