‘हार्नियासाठी याेगाेपचार’

‘हार्निया’ म्हणजे काय? आपल्या शरीरात अनेक अवयव आहेत व त्यांचे कार्य पण वेगवेगळी आहेत. जेव्हा आमच्या शरीरातील आतड्यांचा भाग स्नायूबंधने शिथिल झालेला आहे. पाेटाचे स्नायू शिथिल हाेणे हे हार्नियाचे प्रमूख कारण आहे. आतड्याचा भाग हा साधरणत: चार ठिकाणातून बाहेर येण्याची शक्यता असते.

Story: संतुलन मंत्रा | अंजली पाटील |
27th January 2023, 10:32 pm
‘हार्नियासाठी याेगाेपचार’

१) पुरुषांमध्ये जेथून वृषणग्रंथी पाेटातून बाहेर वृषणकाेषात येतात तेथून लहान आतड्याचा भाग बाहेर येते. 

२) जांघेमध्ये पायांना रक्तपुरवठा करणारी रक्तवाहिनी जेथून मांडीत उतरते तेथे हा आतड्यांचा भाग बाहेर येण्याची शक्यता असते. 

३) नाभीजवळ पाेटाचे स्नायू कमी ताकदवान असतात. तेथूनही आतड्याचा भाग बाहेर येऊ शकताे. 

४) बरेच वेळ ओटी-पाेटाच्या स्नायूमधून आतड्याचा भाग बाहेर येऊ शकताे. 

हार्नियाची कारणे - 

१) पाेटाचे स्नायू शिथिल हाेणे हे हार्नियाचे प्रमुख कारण आहे. 

२) शरीराची अवाजवी व वेडीवाकडी हालचाल, विशेषत: एकदम जड वजन झटक्याने उचलणे.

३) दीर्घकालचा खाेकला, अपचन, मलावराेध, बद्धकाेष्ठता

४) स्थूलपणा, बैठे काम

५) काही स्त्रियांबाबतीत गर्भारपण व बाळंतपण यामुळे पाेटातील स्नायू अशक्त हाेतात व हार्निया हाेण्याची शक्यता निर्माण हाेते. 


याेगाेपचार - 

हार्निया हा पाेटाच्या स्नायूंचा अशक्तपणा असल्याने याेगासनांची निवड फार काळजीपूर्वक केली पाहिजे. विशेषत: पाेटावर झाेपून, विपरीत आसने वर्ज्य केली पाहिजेत. भुजंगासन, शलभासन, धनुरासन, नाैकासन ही आसने या विकाराला त्रासदायक आहेत. 

उपयुक्त आसने : 

उत्तानपादासन, विपरीत पवन मुक्तासन, वज्रासन, सुप्त वज्रासन, उष्ट्रासन ही आसने उपयुक्त आहेत. त्याचबराेबर अग्निसार, उड्डियानबंध व कपालभाती या शुद्धिक्रिया उपयुक्त आहेत. अश्विनी मुद्रा व त्राटक याचा ही फायदा हाेताे. पण हे सर्व तज्ञ व्यक्तीकडूनच करुन घ्यावे. हार्निया झाल्यावर वजन उचलणे, उड्या मारणे, धावपळ करणे बंद करावे. मलमूत्र विसर्जनावेळी कुंथू नये, मांसाहार किंवा पचायला जड पदार्थ खाऊ नये. साधा हलका शाकाहार माफक प्रमाणात घ्यावा. आठवड्यातून एक दिवस लंघन करावे.