हणजूण ड्रग्जप्रकरणी पुरवठारदारास अटक

|
03rd December 2022, 12:08 Hrs
हणजूण ड्रग्जप्रकरणी पुरवठारदारास अटक

प्रतिनिधी। गोवन वार्ता            

म्हापसा : हणजूण पोलिसांनी ड्रग्ज विरोधी कारवाईखाली अटक केलेल्या लिलेश कश्यप (२४, मध्य प्रदेश) यास ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या संशयित नीलेश अरविंद पाटील (३२, रा. हडफडे) यास अटक केली आहे.             

पोलिसांनी गेल्या ३० रोजी दुपारी हणजूणमधील डीप्स ऑन ब्लू प्रिमियम हॉस्टेलजवळ संशयित कश्यप हा ड्रग्जची विक्री करण्यासाठी आला असता त्यास अटक केली होती. त्याच्याकडून ७० हजारांचा ०.७ ग्रॅम एलएसडी पेपर्स हा ड्रग्ज जप्त केला होता.             

 हा ड्रग्ज आपल्याला संशयित नीलेश पाटील याने विकण्यासाठी दिला होता, अशी माहिती संशयित कश्यप याने पोलीस चौकशीवेळी उघड केली होती. त्यानुसार पोलिसांनी संशयित पाटील यास शुक्रवारी सकाळी पकडून याच अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्याखालील गुन्ह्यात अटक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तेजेशकुमार नाईक करत आहेत.