डबल चीनसाठी उपयुक्त व्यायाम

Story: संतुलन मंत्रा । अंजली पाटील |
02nd December 2022, 08:46 pm
डबल चीनसाठी उपयुक्त व्यायाम

डबल चीन म्हणजे काय? आजकाल फार जणांना ही समस्या असतो. यामध्ये आपल्या हनुवटीवर मांस वाढते व आपल्या चेहऱ्याचा घेर वाढतो. याचे कारण म्हणजे आपली जीवनशैली व व्यायामाचा अभाव.

आपण कित्येक तास एकाच जागेवर बसून आपले काम करतो. व्यायाम करायला आपल्याजवळ वेळ नसतो व आपला आहार हा फास्ट फूडवर येऊन पोहोचला असल्याने आपल्याला अनेक आरोग्याच्या तक्रारींना तोंड द्यावे लागते. डबल चीन ही त्यातलीच एक समस्या.

 डबल चिन्ह हा काही फार मोठा आजार नाही आहे व तो घालवायचा असेल तर अगदी सोप्या व्यायामाने घालवता येतो.

 सर्वप्रथम आपण आपल्या आहारावर लक्ष पुरवले पाहिजे. आपला आहार हा पौष्टिक असला पाहिजे व तो ताजा असला पाहिजे. आपल्या आहारात ताजी फळे, ताज्या भाज्या, डाळी, कडधान्य यांचा समावेश असला पाहिजे.

डबल चीन घालविण्यासाठी 'सिंहमुद्रा' फार उपयुक्त आहे.

मानेचे सूक्ष्म व्यायामही डबल चीनवर उपयुक्त आहेत.

आपल्या तोंडामध्ये हवा भरून आपले गाल फुगवावेत असे आठ ते दहा वेळा करावे. असे केल्याने डबल चीन थोड्याच दिवसात कमी होऊ लागेल.

मान वर करून आकाशाला चुंबन दिल्यासारखे करावे हे पण आठ ते दहा वेळा करावे.

आपले दोन्ही गाल हाताने खेचून धरावेत. आपल्या हनुवटीला दोन्ही हाताने आलटून पालटून दाब द्यावेत.

तोंडाचा मोठा आ करावा व पुन्हा बंद करावे असे नियमित दहा ते बारा वेळा करावे.

दोन्ही हाताने चेहऱ्याला व मानेला मसाज करावे.

हे काही अगदी सोपे उपाय आहेत ज्यांचा नियमित सराव केल्यास डबल चीन काही दिवसातच गायब होईल व तुमचा चेहरा पूर्वीसारखा आकर्षक दिसेल.

काही जण डबल चीन घालविण्यासाठी ऑपरेशन करतात पण खरंच याची गरज नाही. वरील उपायांनी डबल चीनची समस्या पूर्णपणे नाहीशी होते.