अमेझॉन प्राईमवर 'कांतारा' प्रदर्शित


24th November 2022, 11:43 pm
अमेझॉन प्राईमवर 'कांतारा' प्रदर्शित

ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा' या चित्रपटाने केवळ कन्नडच नव्हे तर हिंदी भाषेतही चमकदार कामगिरी केली आहे. एकामागून एक दक्षिणेतील अनेक चित्रपटांनी जगभरातील प्रेक्षकांना प्रभावित केले आहे. 'कंतारा' हा ब्लॉकबस्टर चित्रपट अवघ्या २० कोटींच्या बजेटमध्ये बनला आहे. या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाला भारतभरातील प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. आता थिएटरमध्ये धमाल केल्यानंतर, हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला आहे.
ओटीटीवर करणार धमाका
ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा' या चित्रपटात प्रथा आणि परंपरांचे सुंदर चित्रण करण्यात आले आहे. कांतारा या चित्रपटाची निर्मिती होंबळे फिल्म्सने केली आहे. लाखो चाहते या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते. आता अखेर त्यांची प्रतीक्षा संपली आहे. हा चित्रपट २४ नोव्हेंबरपासून अमेझॉन प्राईम व्हिडिओ स्ट्रीम होत आहे.
हिंदी आवृत्तीसाठी प्रतीक्षा लांबली
'कांतारा'च्या हिंदी व्हर्जनसाठी हिंदी प्रेक्षकांना अजून थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. हा चित्रपट सध्या फक्त मल्याळम, तेलुगू, तामिळ आणि कन्नड भाषांमध्ये ओटीटीवर पाहता येईल. अवघ्या २० कोटींमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे. या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. आता 'कांतारा' बॉक्स ऑफिसवर जसा धमाका केला तसाच धमाका ओटीटीवरही रचणार का, हे पाहावे लागेल.