‘हेराफेरी’त कार्तिकची नवीन भूमिका


24th November 2022, 11:43 pm
‘हेराफेरी’त कार्तिकची नवीन भूमिका

बॉलीवूडच्या हिट चित्रपटांपैकी एक 'हेरा फेरी' आणि 'फिर हेरा फेरी'ने लोकांना खूप हसवले. सध्या 'हेरा फेरी ३' हा चित्रपट सतत चर्चेत आहे. वास्तविक, या चित्रपटात कार्तिक आर्यनला कास्ट करण्यात आले असून अक्षय कुमार यात दिसणार नसल्याचे वृत्त आहे. आता ताज्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, कार्तिक आर्यन 'हेरा फेरी ३' या चित्रपटात अक्षय कुमारची भूमिका साकारणार नाही.
'हेरा फेरी ३' या चित्रपटात कार्तिक आर्यन अक्षय कुमारची भूमिका साकारणार असल्याचे बोलले जात होते. या वृत्तानंतर अक्षय कुमारच्या चाहत्यांमध्ये नाराजी असून त्याला चित्रपटात परत घेण्याची मागणी सोशल मीडियावर होऊ लागली आहे.
कार्तिक आर्यनची नवीन भूमिका
‘हेरा फेरी ३’ या चित्रपटात अक्षय कुमारचा भाग नसल्याचे ठरल्यानंतर राजूचे पात्र पूर्णपणे काढून टाकण्यात आले. या चित्रपटात अक्षय कुमार दिसणार नाही. हेरा फेरी ३ या चित्रपटात कार्तिक आर्यन एक नवीन व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे.
अनीस बज्मी करणार दिग्दर्शन
विशेष म्हणजे, अनीस बज्मी दिग्दर्शित 'हेरा फेरी ३' चित्रपटात परेश रावल आणि सुनील शेट्टी पुन्हा दिसणार आहेत. या चित्रपटात कार्तिक आर्यनला कास्ट केल्याची बातमी आहे. हेरा फेरी हा चित्रपट २००० मध्ये रिलीज झाला होता आणि ‘फिर हेरा फेरी’ हा चित्रपट २००६ मध्ये रिलीज झाला होता. या दोन्ही चित्रपटात परेश रावल आणि सुनील शेट्टीसोबत अक्षय कुमार दिसला होता. हे दोन्ही चित्रपट लोकांना खूप आवडले होते.