कांतारा चित्रपट २४ रोजी ओटीटीवर?


17th November 2022, 09:20 pm
कांतारा चित्रपट २४ रोजी ओटीटीवर?

बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम मोडल्यानंतर कांतारा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट २४ नोव्हेंबरला अमेझॉन प्राईम व्हिडिओवर स्ट्रीम होईल. हा चित्रपट हिंदीसह तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित केला जाईल.
कांतारा आधी ४ नोव्हेंबर रोजी ओटीटीवर रिलीज होणार होता, परंतु बॉक्स ऑफिसवरील मजबूत कामगिरीमुळे, रिलीजची तारीख पुढे ढकलण्यात आली. यानंतर हा चित्रपट ११ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार होता, मात्र स्ट्रीमिंगची तारीख पुन्हा एकदा बदलली आहे.
रिलीज डेट ऐकल्यानंतर चाहते उत्साहित
आतापर्यंत निर्मात्यांनी या चित्रपटाची अधिकृत घोषणा केलेली नाही. पण मल्याळम रिव्ह्यू नावाच्या सोशल मीडिया हँडलने पोस्ट शेअर करताना कांताराच्या ओटीटी रिलीजची माहिती दिली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत पेजने लिहिले, ‘मोस्ट अवेटेड कांतारा २४ नोव्हेंबरला ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होत आहे’. अनेक ट्विटर हँडल आहेत ज्यावर चित्रपटाच्या ओटीटी रिलीजबद्दल माहिती देण्यात आली आहे.
बॉक्स ऑफिसवर दमदार कलेक्शन
बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर ऋषभ शेट्टीच्या कांतारा या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात ३६९ कोटींचा आकडा पार केला आहे. अवघ्या १६ कोटींमध्ये बनलेल्या या चित्रपटाने खर्चापेक्षा कितीतरी पटीने अधिक कमाई केली आहे. हा चित्रपट लवकरच ४०० कोटींचा टप्पा पार करेल याची चाहत्यांना प्रतीक्षा आहे.