जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीसाठी आरजी पक्षाकडून उमेदवार जाहीर


04th October 2022, 12:42 am
जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीसाठी आरजी पक्षाकडून उमेदवार जाहीर

प्रतिनिधी | गोवन वार्ता

पणजी : जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीसाठी रिव्होल्यूशनरी गोवन्स पक्षातर्फे सोमवारी पणजीत तीनही उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली. १६ तारखेला पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे.

पणजी येथे पत्रकार परिषदेत आरजीचे प्रमुख मनोज परब यांनी उमेदवारांची नावे जाहीर केली. दवर्लीतून अँड्रू रिबेलो, कुठ्ठाळीतून लेस्ली गामा, तर रेईस मागूशमधून साईनाथ कोरगावकर यांची नावे मनोज परब यांनी जाहीर केली.

परब म्हणाले की, आजपर्यंत अनेक राजकीय पक्षांनी गोव्यातील जनतेचा वेळोवेळी विश्वासघात केलेला आहे. स्वार्थापोटी मतदारांच्या विरुद्ध जाऊन पक्षांतर केले गेले. विकास करण्याचे कारणे सांगून प्रत्येकवेळी जनतेला फसवले गेले. याचेच गंभीर परिणाम सामान्य जनतेला भोगावे लागले.

या पत्रकार परिषदेत सांत आंद्रेचे आमदार वीरेश बोरकर उपस्थित होते. ते म्हणाले की, आमच्या उमेदवारांना जनतेने निवडून आणावे. जिल्हा पंचायतीचा निधी योग्यप्रकारे योग्य कामासाठी व जनतेसाठी हितासाठी वापरला जाईल.