शांतीनगर-वास्को येथून गांजासह एकाला अटक

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
04th October 2022, 12:09 Hrs
शांतीनगर-वास्को येथून  गांजासह एकाला अटकवास्को : वास्को पोलिसांनी गांजाप्रकरणी शांतीनगर-वास्को येथील अब्बास इद्दीन शेख (१८) याला सोमवारी रात्री अटक केली. त्याच्याजवळ १५० ग्रॅम गांजा सापडला. या गांजाची किंमत सुमारे ३० हजार रुपये इतकी होते. याप्रकरणी वास्को पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक गणेश मातोणकर पुढील तपास करीत आहेत.

अब्बास हा गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती खबऱ्यांकडून मिळाल्याने वास्को पोलीस उपनिरीक्षक रोहन नागशेकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दाबोळी येथील हंस गेटसमोरच्या पुलासमोर गस्त सुरू केली. यावेळी रात्री अकराच्या दरम्यान तेथे एका दुचाकीने आलेला अब्बास त्यांच्या तावडीत सापडला. तिथे त्याची तसेच दुचाकीची झडती घेण्यात आली. तेव्हा त्याच्याजवळ गांजा सापडला. पोलिसांनी गाजा व दुचाकी ताब्यात घेतली. अब्बास याच्याविरोधात अमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.