बॅडमिंटन स्पर्धेत सीआयडी क्राईम ब्रँच विजेता


03rd October 2022, 12:30 am
बॅडमिंटन स्पर्धेत सीआयडी क्राईम ब्रँच विजेता

विल्सन डिसोझा, ओमवीर सिंग बिश्नोई यांना दुहेरी विजेतेपदाचा पुरस्कार देताना पोलीस महासंचालक जसपाल सिंग. सोबत पोलीस अधिकारी बॉस्को जॉर्ज. 

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी :
गोवा पोलीस स्पोर्ट्सतर्फे ३० सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत कांपाल इनडोअर स्टेडियम, पणजी येथे पहिल्या आंतर विभाग गोवा पोलीस बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या सांघिक स्पर्धेतील अंतिम सामना सीआयडी क्राईम ब्रँचने वाहतूक विभाग संघ यांच्यात खेळला गेला. ज्यामध्ये सीआयडी क्राईमने विजय मिळवून सांघिक विजेतेपदाची ट्रॉफी जिंकली.
या सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत विविध विभाग, उप-विभागातील एकूण २० संघांनी तसेच १५० हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेदरम्यान १०० हून अधिक सामने दोन दिवस खेळण्यात आले. दुहेरी सांघिक स्पर्धेत आयजीपी ओमवीर सिंग बिश्नोई आणि आयपीएस विल्सन डिसोझा या जोडीने विजेतेपद प्राप्त केले. अंतिम लढतीत गुरुदास कदम आणि नीलेश राणे जोडीचा पराभव केला. एकेरीत गुरुदास कदम यांनी विजय मिळविताना विल्सन डिसोझा यांचा पराभव केला. बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख अतिथी पोलीस महासंचालक जसपाल सिंग, अतिथी ओमवीरसिंग बिष्णाई यांच्या उपस्थितीत पार पडला.