नामिबियातून आलेल्या ‘आशा’ने दिली गुडन्यूज

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
02nd October 2022, 11:27 Hrs
नामिबियातून आलेल्या ‘आशा’ने दिली गुडन्यूज

भोपाळ : दक्षिण अफ्रिकेतून आठ चित्ते भारतात आणण्यात आले आहेत. भारतात चित्ते आल्यानंतर नागरिक त्यांना पाहण्यासाठी उत्सुक असतानाच आता आणखी एक गुड न्यूज समोर येत आहे. मध्यप्रदेशमधील कुनो नॅशनल पार्कमधील आशा मादी चित्ता गर्भवती असल्याची माहिती समोर येत आहे. अद्याप याबाबत कोणीही अधिकृत दुजोरा दिला नसला तरी कुनो नॅशनल पार्कमध्ये वन अधिकारी या मादी चित्त्याची मॉनिटरिंग करत आहेत.
नामिबियातून तीन मादी चित्ता भारतात आणण्यात आले होते. त्यात आशाचा देखील समावेश आहे. आशा हे नाव पंतप्रधान मोदी यांनी ठेवले होते. मादी चित्ता गर्भवती असल्याचे संकेत मिळत असताना वन अधिकाऱ्यांच्या मनातही आशा निर्माण झाली आहे. लवकरच भारतात चित्त्यांची संख्या वाढणार आहे. तिचे व्यावहारिक, शारीरिक आणि हार्मोनल बदलांमुळे ती गर्भवती असल्याचे स्पष्ट होत आहे, असे प्रोजेक्ट चित्ता सांभाळणाऱ्या एका अधिकाऱ्याने म्हटले आहे. मात्र, या संकेतावरुनच उत्सुक न होता आपल्याला ऑक्टोबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.