पचनशक्ती वाढवण्यासाठी योगासने व आहार

९९% आजार हे पोटातूनच सुरू होतात असं म्हटलं जातं. म्हणूनच पचनाचे व पचनशक्तीचे महत्त्व आहे. पचन चांगलं करण्यासाठी व चांगलं असेल तर अजून चांगलं करण्यासाठी कोणती आसने करावीत आणि आहार कसा असावा हे जाणून घेऊया.

Story: संतुलन मंत्रा । अंजली पाटील |
30th September 2022, 10:21 Hrs
पचनशक्ती वाढवण्यासाठी योगासने व आहार

 पचनशक्ती वाढवण्यासाठी

आपलं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर पचनशक्ती चांगली असणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. पचन चांगलं असेल तर तुम्ही निरोगी राहता.

पचनक्रिया म्हणजे अन्नाचे विघटन करून त्यातील पोषक तत्त्वांनी शरीरात शोषण करण्यास मदत करणे ही क्रिया योग्य असणे म्हणजेच शरीराचे पचनशक्‍ती योग्य असणे जर पचनशक्ती दुर्बल असेल तर शरीराला पोषक तत्वांची कमतरता भासू लागते.

आहार

१) सर्वप्रथम जेव्हा भूक लागते तेव्हाच अन्नाचे सेवन करावे.

२) अन्न व्यवस्थित चावून खावे.

३) जेवणात तंतूमय पदार्थांचा समावेश असावा.

४) ज्या पदार्थात जास्त प्रमाणात फॅट्स असतात ते पदार्थ टाळावेत.

५) जेवणाची वेळ निर्धारित करावी.

६) पाणी भरपूर प्यावे पण जेवताना जास्त पिऊ नये.

७) सिगरेट दारू यांचा पचनसंस्थेवर परिणाम होतो म्हणून या सवयींना आळा घालावा.

८) प्रोबायोटिक्स जसे दही, ताक यांचा आहारात समावेश करावा.

९) तणावामुळे पाचकरस बनण्याच्या प्रक्रियेत बिघाड निर्माण होतो त्यामुळे तणावमुक्त व आनंदी राहणे गरजेचे आहे.

१०) व्यायाम व पचनशक्ती चालना देते त्यामुळे नियमित व्यायाम व योगासने करावीत

 पचनशक्तीसाठी उपयुक्त योगासने :

१) उत्तानासन

२) पादहस्तासन

३) पादांगुष्ठासन

४) उत्थित त्रिकोणासन

५) पश्चिमोत्तासन

६) अर्ध मत्सेंद्रासन

७) जानुशिरासन

८) हलासन

९) कर्णपिडासन

१०) उष्ट्रासन

११) मयूरासन

१२) मत्स्यासन

१३) राजकपोतासन

१४) परिपूर्ण नावासन

१५) सिंहासन

१६) नौकासन

१७) शलभासन

१८) मकरासन

१९) धनुरासन

२०) भुजंगासन

२१) कूर्मासन

२२) शीर्षासन

२३) सर्वांगासन

२४) शवासन

 वरील सर्व आसने पचनशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहेत. सर्व आसने एकदाच केली पाहिजेत असे काही नाही. नियमितपणे थोड्या-थोड्या आसनांचा सराव करावा.

आसने करताना कोणत्याही प्रकारची घाई गडबड करू नये. आपल्या क्षमतेनुसार आसने करावीत. आसनांचा अभ्यास करताना आपले सर्व लक्ष आसनांवर असावा व प्रसन्न वातावरणात आसने करावीत.