'भेडिया'चा ट्रेलर रिलीजसाठी सज्ज

|
30th September 2022, 10:02 Hrs
'भेडिया'चा ट्रेलर रिलीजसाठी सज्ज

बॉलिवूड सुपरस्टार वरुण धवनच्या आगामी 'भेडिया' या चित्रपटाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. दरम्यान, वरुणच्या ‘भेडिया’बाबत मोठे अपडेट्स समोर येत आहेत. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी गुरुवारी 'भेडिया' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. यासोबतच या चित्रपटाचा ट्रेलर कधी प्रदर्शित होणार याचीही माहिती देण्यात आली आहे. या चित्रपटात वरुण धवनसोबत अभिनेत्री क्रिती सेनन मुख्य भूमिकेत आहे.
गुरुवारी, बॉलिवूड चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर वरुण धवनच्या आगामी 'भेडिया' चित्रपटाविषयी मोठी माहिती दिली आहे. तरणने आपल्या पोस्टमध्ये भेडियाचे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरसोबत तरण आदर्शने लिहिले आहे की, वरुण धवन आणि क्रिती सेनन स्टारर फिल्म भेडिया २५ नोव्हेंबर २०२२ रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. यासोबतच शुक्रवार ३० सप्टेंबर रोजी भेडियाचा ट्रेलर रिलीज होणार असल्याची घोषणाही होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर कोणत्या दिवशी प्रदर्शित होणार याची माहिती टीम भेडिया सादर करणार आहे. बातम्यांनुसार, दिवाळीच्या मुहूर्तावर भेडियाचा ट्रेलर रिलीज होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.