सनीचा ‘चुप’ बॉक्स ऑफिसवर एकदम ‘चुप’


30th September 2022, 10:01 pm
सनीचा ‘चुप’ बॉक्स ऑफिसवर एकदम ‘चुप’

बॉलीवूड अभिनेता सनी देओल आणि दुलकर सलमान यांच्या ‘चुप’ या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये सातत्याने घसरण होत आहे. आर. बाल्की दिग्दर्शित या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी ज्या प्रकारे कमाई केली होती, ते पाहता आगामी काळातही हा चित्रपट चांगली कमाई करेल, असे मानले जात होते, परंतु तेव्हापासून चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये सातत्याने घट दिसून आली आहे. जरी सनी देओलच्या सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपटाला समीक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असला तरी, त्याच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये सुधारणा होताना दिसत नाही.
सलग १२ फ्लॉप चित्रपटानंतर ‘चुप’ हा बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा १३ वा चित्रपट आहे. सनी देओलला या चित्रपटाकडून खूप आशा आहेत. रिलीजच्या पाचव्या दिवशी म्हणजे मंगळवारी, चुपने बॉक्स ऑफिसवर १ कोटींहून अधिक कमाई केली. चौथ्या दिवशीही चित्रपटाची कमाई जवळपास १ कोटी होती. अशाप्रकारे चित्रपटाच्या कमाईने ५ दिवसांत १० कोटींचा आकडा पार केला आहे.
चुपमध्ये श्रेया धन्वंतरी देखील आहे, जी स्कॅम १९९२ मध्ये दिसली होती आणि तिच्या अभिनयाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. याशिवाय या चित्रपटात पूजा भट्टही आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक आर. बाल्की यांनी केले असून चुपची कथाही त्यांनीच लिहिली आहे. २३ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त हा चित्रपट प्रदर्शित झाला. या दिवशी ७५ रुपयांना तिकिटांची विक्री झाल्यामुळे चित्रपट बॉक्स ऑफिसवर उत्तम कलेक्शन करण्यात यशस्वी ठरला.