गोवन थंडगार

Story: अन्नपूर्णा । स्वप्ना नाईक |
23rd September 2022, 11:19 pm
गोवन थंडगार

साहित्य

५०० ग्रॅम चिकन, २ चमचे आले लसूण पेस्ट,  १ टीस्पून मिरची पावडर,  १ टीस्पून गरम मसाला, २ चिरलेला कांदा, २ चिरलेले टोमॅटो, १/४ कप चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, २ चमचे तेल

मॅरीनेशनसाठी

चिकनला आले लसूण पेस्ट लावून तासभर ठेवा. 

कृती

कढईत तेल गरम करा. कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्या व त्यात मिरची पावडर, गरम मसाला घालून २ मिनिटे परतून घ्या. टोमॅटो घालून टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घ्या. मीठ घालून चांगले मिक्स करा. चिकन घालून ५ मिनिटे परतून घ्या, पाणी झाकून ठेवा आणि मंद आचेवर शिजू द्या. ताजी कोथिंबीर घालून कडक पावासोबत गरमागरम सर्व्ह करा.