फायर ऑफिसर श्रीकृष्ण पर्रीकर यांना आज गौरविणार


14th August 2022, 11:38 pm
फायर ऑफिसर श्रीकृष्ण पर्रीकर यांना आज गौरविणार

श्रीकृष्ण पर्रीकर

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी :
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे अग्निशमन दलाचे स्टेशन फायर ऑफिसर श्रीकृष्ण रवींद्र पर्रीकर यांना राष्ट्रपती अग्निशमन पदक जाहीर करण्यात आले होते. हे पदक सोमवारी १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमावेळी त्यांना प्रधान करण्यात येणार आहे.
अग्निशमन दलात उत्कृष्ट सेवा बजावल्यामुळे अग्निशमनचे फायर ऑफिसर श्रीकृष्ण पर्रीकर यांना राष्ट्रपदी अग्निशमन पदक जाहीर करण्यात आले होते. त्यांनी १९९६ मध्ये फायरमॅन म्हणून सेवेला सुरुवात केली. त्यानंतर २०१० मध्ये त्यांची उपअधिकारी म्हणून बढती देण्यात आली. त्यानंतर २०१५ मध्ये त्यांना स्टेशन फायर ऑफिसरपदी बढती देण्यात आली आहे.
काणकोण येथील रुबी रेसिडेन्सी इमारत कोसळून त्यात अडकलेल्या कामगारांना वाचविल्यामुळे २०१५ मध्ये त्यांना मुख्यमंत्री शौर्य पदक देऊन गौरवण्यात आले आहे. २०१७ मध्ये मुख्यमंत्री अग्निशमन पदक देण्यात आले आहे. त्यांनी पणजी, म्हापसा, मुख्यालय नियंत्रण कक्ष, मडगाव व इतर ठिकाणी सेवा बजावली असून सद्यस्थितीत त्यांना स्टोअर व मोटर वाहन विभागाची आणि पिळर्ण अग्निशमन स्थानकांची जबाबदारी देण्यात आली आहे.