देशप्रेमी नागरिकांतर्फे वास्कोत मूक मोर्चा

|
14th August 2022, 11:53 Hrs
देशप्रेमी नागरिकांतर्फे वास्कोत मूक मोर्चा

वास्को : फाळणी स्मृती दिनानिमित्त भाजप व देशप्रेमी नागरिकांतर्फे रविवारी सायंकाळी मूक फेरी काढण्यात आली. या फेरीत शेकडोजण हातात तिरंगा घेऊन सहभागी झाले होते.

येथील मुरगाव पालिका इमारतीपासून मूक फेरीला आरंभ झाला. या फेरीमध्ये पंचायत मंत्री व दाबोळीचे आमदार माविन गुदिन्हो, वास्कोचे आमदार दाजी साळकर, माजी आमदार दामू नाईक, मुरगावचे नगराध्यक्ष लिओ रॉड्रिग्ज, उपनगराध्यक्ष अमेय चोपडेकर, नगरसेवक दीपक नाईक, नगरसेवक विनोद किनळेकर, नगरसेविका शमी साळकर, गोवा प्रदेश भाजप समितीचे कार्यकारिणी सदस्य जयंत जाधव, माजी नगराध्यक्ष क्रितेश गावकर, माजी उपनगराध्यक्ष रिमा सोनुर्लेकर तसेच माजी सैनिक, विविध उच्च माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. मूक फेरी एफ. एल. गोम्स मार्गावरून हुतात्मा चौकात आल्यावर सांगता झाली.