एक पाऊल टेक्निकल साक्षरतेकडे

Story: टेक्नो जगतात | ऋषभ एकावडे |
30th July 2022, 10:02 Hrs
एक पाऊल टेक्निकल साक्षरतेकडे

मित्रहो, "टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी" करता करता ८-९ महिने आपण काढले. ह्यात वेगवेगळ्या गोष्टींची, उपकरणांची अन् पर्यायाने आपल्याला आधीच माहीत असलेल्या अनेक गोष्टींची माहिती आपण जाणून घेतली. काहींच्या प्रतिक्रिया आल्या अन् काहींचे हक्काचे आग्रह सुद्धा अन् त्याच वाऱ्यावर स्वार होऊन मी अनेक गोष्टी आपल्या समोर मांडत गेलो. आजच्या अंकात काय लिहावे ह्याचा विचार करत असतानाच, कानावर कुठून तरी काही गोष्टी पडल्या. बाबा आपल्या मुलाला म्हणत होते  "काय अर्थ आहे रे ते इंजिनियरिंग करून, २ वर्षे होत आली तरी कामाचा काही पत्ता नाही!" त्या मुलाची होणारी कुचंबणा काही पहावली गेली नाही. मग उठून आलो तेथून अन् उघडला लॅपटॉप अन् आता बोटं चालू लागलीत.

आज पासून  मी लिहितोय आणि पुढे लिहिणार  ते अशाच इंजिनिअर आणि तत्सम पदवीधारकांना उद्देशून ज्यांना टेक्नॉलॉजी आणि त्याच्या बद्दल खरेच खूप काही माहिती आहे पण तरीही ते नोकरी पासून मैलो लांब आहेत. मनाजोगता जॉब नसेल मिळत ही एक बाब सोडली तर काही महाभाग असेही आहेत ज्यांना फक्त सरकारी नोकरी हवी आहे किंवा काही जण असेही ज्यांना इंजिनरिंग करून पुढे काय जॉब करू? हा प्रश्न पडलाय !

या भागात आणि पुढच्या येणाऱ्या असंख्य भागात आपण सरकार मान्य अशा अनेक स्कीम / फेलोशिप /स्कॉलरशिप  बद्दल जाणून घेणार आहोत  ज्या तुम्हाला तुमच्या पायावर उभे राहण्यास खूप मदत करतील.

@ Abdul Kalam Technology Innovation National Fellowship

भारतीय युवा मनाचा कस लक्षात घेऊन त्यांना अभियांत्रिकी, वैज्ञानिक अन् संशोधनात्मक ज्ञान देऊन त्यास हर तऱ्हेने उद्यमशील अन् सक्षम बनविणे हे ह्या fellowship चे मुख्य उद्दिष्ट आहे.

 ह्यात नावीन्यपूर्ण  - अभियांत्रिकीचा भरणा आहे तर  Indian National Academy of Engineering (INAE) ही संस्था ह्या स्कॉलरशिपचे सर्व सोपस्कार पूर्ण करेल.

SERB-DST च्या मदतीने तुमचे कार्य पाहून तुम्हाला "Abdul Kalam Technology Innovation National Fellowship" प्रदान केले जाईल.

  प्रॉग्रमचा प्रकार ?

 संशोधन आणि विकास.

 मंत्रालय / विभाग ?

 Department of Science & Technology (DST), Govt of India.

  कशावर आधारित ?

 अभियांत्रिकी , नाविन्यता आणि तंत्रज्ञान.

  कुणासाठी ?

 अभियांत्रिकी शाखेचे कुणीही.

  फंडींग कोण करेल ?

 Science and Engineering Research Board (SERB).

पात्रता ?

 कुणीही भारतीय ज्याच्याकडे अभियांत्रिकीची पदवी आहे तो.

(कामाचा अनुभव असेल तर उत्तम, नाही तरी काही फरक नाही पडणार नाही!)

 का?

संशोधन आणि नाविन्यता (innovation)

 फंडिंग कसे केले जाईल ?

वर्षातून २ वेळा.

 स्कॉलरशिपचा कालावधी?

३ ते ५ वर्षे 

 ऍप्लिकेशन कसे करावे?

ऑफलाईन.

 fellowship / आर्थिक सहाय्य ?

फेलो शिप  ही रू २५०००/- प्रती माह / सोबत महिन्याचे वेतन.  त्या बाहेर १५ लाख प्रती वर्ष ही संशोधनासाठी दिली जाणारी ग्रँट. त्यात १ लाख प्रती माह हा ओवर हेड असेल.

वेब साईटचा फोटो दिलेला आहे, त्यावर पुढे गेल्यावर supplementary लिंक्स वगैरे मिळतील, त्यानुसार बघा आपले काय जमते काय! आणि नाही जमले तर मी आहेच पुढच्या रविवारी परत. घेऊन येईन नवे काही तरी टेक्नॉलॉजीच्या पोतडीतून... तो पर्यंत

लोभ असावा!