१३० कोटींचा मालक सुपरस्टार धनुष


28th July 2022, 08:47 pm
१३० कोटींचा मालक सुपरस्टार धनुष

बॉलिवूड आणि साऊथ चित्रपटांचा अभिनेता, गायक, दिग्दर्शक आणि निर्माता धनुषने २८ जुलै रोजी आपला वाढदिवस साजरा केला. बॉलीवूड व्यतिरिक्त धनुष साऊथचेही प्रसिद्ध नाव आहे. त्याचे देशभरात प्रचंड चाहते आहेत. धनुषचे खरे नाव व्यंकटेश प्रभू कस्तुरी राजा आहे. धनुषने त्याचे वडील कस्तुरी राजा यांच्या 'थुल्लूवधो इलामाई' या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. धनुषला करिअरच्या सुरुवातीला खूप त्रास सहन करावा लागला होता. अभिनेत्याच्या लूकमुळे त्याची खिल्ली उडवली गेली.
धनुषचे वडील कस्तुरी राजा हे तमिळ चित्रपटांचे दिग्दर्शक आणि निर्माते होते. धनुषला अभिनेता नव्हे तर शेफ बनायचे होते. त्यासाठी त्याला हॉटेल मॅनेजमेंट स्कूलमध्ये प्रवेश घ्यायचा होता. धनुषचा भाऊ आणि दिग्दर्शक सल्वाराघवन यांनी त्याला अभिनयासाठी तयार केले. धनुषने अभिनेता विजय सेतुपतीसोबतच्या संभाषणात सांगितले होते की, २००३ मध्ये जेव्हा तो कादल कोंडन या चित्रपटाचे शूटिंग करत होता, तेव्हा लोक त्याच्यावर सेटवर हसायचे. धनुषच्या म्हणण्यानुसार, 'सगळे मला सेटवर सांगायचे की त्या ऑटो ड्रायव्हरकडे बघ, तो हिरो आहे. असा एकही दिवस जात नाही जेव्हा मला बॉडी शेमिंग किंवा ट्रोल केले गेले नसेल. मी माझ्या गाडीत रडायचो. ऑटो ड्रायव्हर कधीच हिरो होऊ शकत नाही का असा प्रश्न मला पडायचा.
निव्वळ संपत्ती
फोर्ब्स मासिकाने प्रसिद्ध केलेल्या टॉप १०० सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत धनुषने सहा वेळा स्थान मिळवले आहे. मासिकानुसार, २०१९ पर्यंत त्याची कमाई ३१.७५ कोटी रुपये आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, धनुषची एकूण संपत्ती सुमारे १६० कोटी आहे. तो दर महिन्याला एक कोटी रुपयांहून अधिक कमावतो. एका चित्रपटासाठी तो सात ते आठ कोटी रुपये घेतो. धनुषचे चेन्नईच्या पॉश भागात घर आहे. त्याची किंमत २५ कोटी रुपये आहे. याशिवाय त्यांच्याकडे रेंज रोव्हर, रोल्स रॉयस घोस्ट आणि मर्सिडीज बेंझ सारख्या कारचे कलेक्शन आहे.
हे रेकॉर्ड यूट्यूबवर आहेत
अभिनेता असण्यासोबतच धनुष एक यशस्वी गायक देखील आहे. २०११ मध्ये रिलीज झालेले त्याचे कोलावरीडी हे गाणे यूट्यूबवर १०० मिलियन्स व्ह्यूज मिळवणारे पहिले भारतीय गाणे होते. २०१९ मध्ये रिलीज झालेले त्याचे राऊडी बेबी हे गाणे एक बिलियन व्ह्यूज मिळालेले पहिले दक्षिण भारतीय गाणे होते.
धनुषची कारकीर्द
आपले करिअर सुरू करण्यापूर्वी धनुषने अलवर्थिरुनगर येथील सेंट जॉन मॅट्रिक्युलेशन स्कूलमधून केवळ १२वीचे शिक्षण घेतले. सलियाग्राममच्या साठिया मॅट्रिक्युलेशन स्कूलमधून दहावीचे शिक्षण घेतले. धनुषला त्याचे शिक्षण अर्धवट सोडावे लागले. कारण त्याच्या वडिलांच्या चित्रपटात त्याला मुख्य भूमिकेसाठी धनुषच्या कारकिर्दीतील पहिला चित्रपट मिळाला होता.
२००२ मध्ये आलेल्या या चित्रपटाचे नाव 'थल्लूवधो इलामई' होते. तमिळमध्ये हा चित्रपट खूप चालला होता. यानंतर 'कधाल कोंडाईन' हा चित्रपट आला, ज्यामध्ये त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला.
धनुषचे यश
धनुषने २०१३ साली बॉलिवूडमधील 'रांझना' चित्रपटात कुंदन नावाच्या व्यक्तीची भूमिका साकारली होती, या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत होता. हिंदी चित्रपटसृष्टीत हा चित्रपट खूप आवडला होता. धनुषने २०११ मध्ये 'व्हा धिस कोलावेरी डी' हे गाणे गायले होते. हे गाणे तमिळ चित्रपटासाठी गायले होते. मात्र या गाण्याने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली होती. त्या वर्षीचे हे गाणे सर्वाधिक ऐकल्या गेलेल्या गाण्यांमध्ये पहिल्या स्थानावर होते. हे गाणे १०० मिलियनहून अधिक लोकांनी पाहिले.
धनुषने अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'शमिताभ' चित्रपटातही काम केले होते. अमिताभ बच्चन यांनीही त्याची खूप प्रशंसा केली आणि त्याच्या अभिनयाने ते खूप प्रभावित झाले. धनुषला ३ राष्ट्रीय आणि ७ फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत.
धनुष्यचे वैयक्तिक जीवन
धनुषचे वैयक्तिक आयुष्य अतिशय साधे आहे. धनुषचे वयाच्या २० व्या वर्षी लग्न झाले. तामिळ चित्रपटातील सुपरस्टार अभिनेता रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या हिला 'कादल कोंडे' (२००३) चित्रपटादरम्यान भेटली. भेटीनंतर ऐश्वर्याने धनुषला भेटण्यासाठी पुष्पगुच्छही पाठवले. तसेच लवकरच लग्न करण्याचा निर्णय घेतला.
नुकतेच धनुषनेही त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून आपला घटस्फोट जाहीर केला. आता ते एकमेकांपासून पूर्णपणे विभक्त झाले आहेत. धनुष- ऐश्वर्याला दोन पुत्र असून त्यांचे नाव 'यात्रा' आणि 'लिंग' आहे.