जेएसए कम्युनिकेशन्स संघाला टेबल टेनिसचे अजिंक्यपद


05th July 2022, 09:29 pm
जेएसए कम्युनिकेशन्स संघाला टेबल टेनिसचे अजिंक्यपद

पणजी : व्या अखिल भारतीय आमंत्रित एमएससी चषक टेबल टेनिस स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. या स्पर्धेचे आयोजन मल्टिपर्पज स्टेडियम, पेडे-म्हापसा येथे करण्यात आले होते.      

विजेत्या जेएसए संघात अर्जुन घोष, सौरव साहा, सुरजीत दास आणि मोमिता दत्ता यांचा समावेश होता. जेएसएने खुल्या सांघित किताबी लढतीत एव्हीएससी संघाचा ३-०ने पराभव केला. एव्हीएससी संघातर्फे स्वरेंदू चौधरी, अली एमडी, अरिंदम देबनाथ आणि साई प्रशांत यांनी शानदार कामगिरी करत आपल्या संघाला अंतिम फेरीपर्यंत नेण्यात यश मिळवले. मात्र जेएसएच्या राष्ट्रीय चॅम्पियन सौरव साहा व अर्जुन घोष यांनी सजलेल्या मजबूत संघासमोर त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.      

बीटीटीए संघाने १५ वर्षांखालील टीम चॅम्पियनशिपमध्ये लिटल चॅप्स संघाचा ३-०ने पराभव करत विजेतेपद पटकावले. समायरा ससुआरेस, आयुषी गोडसे आणि तनिष्का कालभैरव यांच्या संघाने सुवर्णपदक पटकावले तर रिषन शेख, कौशल नाईक, अॅरोन फारीस आणि अक्षन लवंदे यांच्या संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.      

वैयक्तिक स्पर्धांमध्ये अर्जुन घोष आणि सौरव साहा यांनी मौमिता दत्ता आणि सुरोजित दास यांचा पराभव करत खुल्या दुहेरीत विजय मिळवला. अर्जुनने एक संस्मरणीय खेळी केली, ज्याने अंतिम फेरीत अली महम्मदवर संघर्षपूर्ण विजय मिळवून ओपन सिंगल्सचे विजेतेपद मिळवले. स्वर्णेंदू सी / अली एम आणि कौस्तुभ यू / जयेश के यांनी खुल्या दुहेरी प्रकारात कांस्यपदकावर समाधान मानावे. खुल्या एकेरीत, उपांत्य फेरीतील सौरव साहा आणि स्वर्णेंदू चौधरी यांना हरवून तिसरे स्थान मिळविले.एमएससी अधिकारी जोएल आंद्राद (अध्यक्ष आणि सीसीपी कौन्सिलर), नोएल एस्टिबेरो (उपाध्यक्ष), मायरॉन परेरा (कोषाध्यक्ष), कबीर पिंटो माखिजा (सीसीपी कौन्सिलर आणि गोवा टीटी असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य), डॅनियल पिंटो आणि अमेय लवंदे (क्रीडा प्रवर्तक) यांनी अंतिम फेरीला उपस्थिती लावली होती.