राष्ट्रीय वोविनाम स्पर्धेत गोव्याला सात पदके


22nd June 2022, 12:05 am
राष्ट्रीय वोविनाम स्पर्धेत गोव्याला सात पदके

पंजाब येथे झालेल्या राष्ट्रीय वोविनाम मार्शल आर्ट चॅम्पियनशीप स्पर्धेतील पदक प्राप्त गोवा संघ.


प्रतिनिधी। गोवन वार्ता
म्हापसा :
अकराव्या राष्ट्रीय वोविनाम मार्शल आर्ट चॅम्पियनशीप स्पर्धेत गोव्याच्या वोविनाम संघाने सात पदकांची कमाई केली. यात तीन सुवर्ण, एक रौप्य व तीन कांस्य पदकांचा समावेश आहे. जालंधर-पंजाब येथे शाहपूर सीटी ग्रुप इन्स्टिट्यूट कॅम्पस मैदानावर ही स्पर्धा पार पडली. स्पर्धेत सात सदस्यीय गोवा संघामध्ये गोवा वोविनाम असोसिएशन व गोवा युवा स्पोर्ट्स क्लबच्या वोविनामपटूंचा समावेश होता.
त्यातील लक्षित प्रजापती, तेजस नाईक व तेजस राठोड यांनी सुवर्णपदक, स्वरीत रेमळकर याने रौप्यपदक तर संदेश विश्वकर्मा, अनुश्री परब व साईकुमार चलवाडी यांनी कांस्यपदक प्राप्त केले. या स्पर्धेत देशभरातील २० राज्यांतील ४५० पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत सांघिक चॉम्पियनशीप महाराष्ट्र संघ ठरला, तर तामिळनाडू संघाला उपविजेतेपद प्राप्त झाले.
ही स्पर्धा वोविनाम असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. विष्णू सहाय, महासचिव प्रत्यूष पांडे, कार्यकारी सचिव मास्टर शंकर महाबल व पंचाब संघटनेचे सचिव सिफू तरूण कुमार नरजारी यांच्या देखरेखीखाली झाली. गोवा वोविनाम असोसिएशनचे अध्यक्ष शुभम कळंगुटकर व गोवा युवा स्पोर्ट्स क्लबच्या अध्यक्षा कृतिका गोलतेकर व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या यशाबद्दल समाधान व्यक्त केले व पदक विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले.