गोव्यातून जाणार मशाल रिले

|
19th June 2022, 10:46 Hrs
गोव्यातून जाणार मशाल रिले

पणजी : ४४व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या मशाल रिलेच्या उद्घाटन समारंभाला गोव्यातर्फे क्रीडामंत्री गोविंद गावडे व गोवा क्रीडा प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक अजय गावडे यांच्यासह भक्ती कुलकर्णीनेही उपस्थिती लावली. गोव्याची महिला ग्रँड मास्टर आणि इंटरनॅशनल मास्टर भक्ती कुलकर्णी देखील या स्पर्धेत भारतीय पथकाचा भाग आहे. ३ जुलै रोजी होणार्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड मशाल रिलेचा गोवा लेग भव्य व यशस्वी करण्यासाठी आम्ही आधीच नियोजन आणि व्यवस्था करत आहोत आणि सर्व गोमंतकीयांनी यावे आणि मशाल रॅलीच्या ऐतिहासिक कार्यक्रमाचा भाग व्हावे, असे आवाहन गोविंद गावडे यांनी केले.