आगशीत धीरयोप्रकरणी दोघांना अटक व सुटका

|
18th June 2022, 12:01 Hrs

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी :
मेणकुरे-आगशी येथे बुधवारी धीरयो शर्यती लावण्यात आल्या होत्या. या प्रकरणी आगशी पोलिसांनी बैलांचे मालक प्रकाश नाईक (सुलाभाट-आगशी) आणि राॅक पेरेरा (पिलार-आगशी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी दोघा मालकांची जामिनावर सुटका करण्यात आली.
आगशी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी मेणकुरे-आगशी येथील शेत जमिनीत धीर‍यो आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी कृष्णा आणि रॉबिनहूड या दोन बैलांची धीरयो लावण्यात आली होती. या प्रकरणी पोलीस निरीक्षक तुलसीदास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुजय कोरगावकर यांनी प्रकाश नाईक आणि राॅक पेरेरा या दोघा मालकांविरोधात प्राणी क्रुरता प्रतिबंधक कायद्याच्या कलम ११ (एम) अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. अटक करण्यात आलेल्या दोन्ही संशयितांना नंतर जामिनावर सुटका करण्यात आली.