कुडणे येथे आज स्तनकर्करोग तपासणी शिबिर

डॉ. शेखर साळकर : भाजप वैद्यकीय समितीतर्फे ग्रामीण भागात जागृती

|
24th May 2022, 12:28 Hrs
कुडणे येथे आज स्तनकर्करोग तपासणी शिबिर

फोटो : पत्रकार परिषदेत माहिती देताना भाजप वैद्यकीय समितीचे अध्यक्ष डॉ. शेखर साळकर. सोबत डॉ. स्नेहा भागवत, डॉ. मिलींद देसाई, डॉ. धर्मेद्र प्रभुदसाई आणि डॉ. आसिफ अली.
प्रतिनिधी । गाेवन वार्ता
पणजी : गोव्यातील वाढत्या स्तनकर्करोगावर नियंत्रण आणण्यासाठी भाजप मंडळाच्या वैद्यकीय समितीतर्फे ग्रामीण भागात जनजागृती माेहीम सुरू केली आहे. मंगळवारी सकाळी ९.३० वा. कुडणे येथील सरकारी प्राथमिक शाळेमध्ये मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत या शिबिराचा प्रारंभ हाेणार आहे, अशी माहिती भाजपच्या वैद्यकीय समितीचे अध्यक्ष डॉखर . शेसाळकर यांनी साेमवारी पत्रकार परिषदेत दिली.
गोव्यात स्तनाचा कर्कराेग होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. बदलते राहणीमान, व्यायामाचा अभाव, लठ्ठपणा आदी कारणांमुळे स्तनकर्करोगाचे रुग्ण वाढत आहेत. ग्रामीण भागात जागृतीसाठी शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे. प्राथमिक स्तरावरच या राेगाचा उपचार करायला मिळावा, यासाठी हे शिबिर आहे. प्रत्येक ठिकाणी १०० महिलांची तपासणी केली जाईल, असे डॉ. शेखर साळकर यांनी सांगितले.
सध्या साखळी मतसदारसंघातील कुडणे येथे २४ रोजी, २६ मे राेजी आमाेणा, २८ राेजी वेळगे, ३० राेजी सुर्ला, २ जून राेजी पाळी आणि ४ जून राेजी नावेली येथे हे शिबिर असणार आहे. दक्षिण गोव्यात २५ राेजी सावर्डे, २७ राेजी काले, ३० राेजी कुळे शिगाव, १ जून राेजी मोले, ३ राेजी साकोर्डा, ५ राेजी धारबांदोडा आणि ७ राेजी किर्लपाल दाबाळ येथे हे शिबिर असणार आहे, अशी माहिती डॉ. शेखर साळकर यांनी दिली.