देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्काराचे वितरण

किशोर नाईक गांवकर, भास्कर नाईक यांना प्रदान

|
24th May 2022, 12:26 Hrs
देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्काराचे वितरण

मडगाव : येथील रवींद्र भवन येथे झालेल्या कार्यक्रमात ‘देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार २०२२’चे वितरण करण्यात आले. विश्व संवाद केंद्र गोवाच्या निवड समितीने केलेल्या निवडीनुसार यावर्षी ‘देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार २०२२ - जीवनगौरव पुरस्कार’ गोवन वार्ता लाईव्हचे संपादक किशोर नाईक गांवकर यांना देण्यात आला. ‘देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार २०२२ - विशेष कामगिरी’ पुरस्कार दै. हेराल्डचे पत्रकार भास्कर देसाई यांना देण्यात आला. विश्व संवाद केंद्र ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिवार संघटनेतील पत्रकारिता क्षेत्रात काम करणारी संस्था आहे. या संस्थेमार्फत दरवर्षी देवर्षी नारद जयंतीचे औचित्य साधून ‘देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार’ दिला जातो. यावर्षी हा पुरस्कार किशोर नाईक गांवकर व भास्कर देसाई यांना समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.