कमल हासन पुन्हा अॅक्शनपटमध्ये


12th May 2022, 11:52 pm
कमल हासन पुन्हा अॅक्शनपटमध्ये

कमल हासनचा बहुप्रतिक्षित ‘विक्रम’ चित्रपटाचा ट्रेलर अखेर १३ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. मेगास्टार कमलशिवाय विजय सेतुपती आणि मल्याळी सुपरस्टार फहद फैसल विक्रममध्ये दिसणार आहेत. चित्रपटाची स्टारकास्ट इतकी दमदार आहे की, चित्रपट पाहून प्रत्येकाला घाम फुटतो. कमलसोबत लोकेश कनगराजची जोडी हा चित्रपटाचा सर्वात मोठा यूएसपी असणार आहे.
तीन वर्षांपासून चाहते प्रतीक्षेत
विक्रम हा तमिळ सिनेमातील सर्वात मोठा अॅक्शनपट आहे. जे ११५ कोटींच्या प्रचंड बजेटमध्ये बनवण्यात आले आहे. अलीकडेच ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्विट करून हा चित्रपट तमिळसह हिंदी भाषेतही प्रदर्शित होणार असल्याची माहिती दिली. जयंती लाल गडा यांची पॅन मुव्हीज विक्रमचे वितरण करत आहे. अशा परिस्थितीत विक्रम हिंदी पट्ट्यात अधिकाधिक स्क्रीनवर प्रदर्शित होईल, अशी अपेक्षा चाहत्यांना आहे.
टीझर आणि ग्लिम्सने चाहत्यांची जिंकली मने
कमल हासनच्या वाढदिवसानिमित्त, चित्रपटाच्या निर्मात्यांनी टीझर आणि विक्रमचा एक ग्लिम्स व्हिडिओ शेअर केला होता. ज्याने सोशल मीडियात खळबळ उडवून दिली. दोन-तीन मिनिटांच्या टीझरमध्ये मेगास्टार कमलची मेहनत आणि लोकेश कनगराजची परफेक्शन स्पष्टपणे दिसत होता. विक्रमचे बीजीएम रोमांच वाढवणारा आहे. जे ऐकून प्रत्येकजण आश्चर्यचकित होईल. उर्वरित चित्रपटाचा ट्रेलर १३ मे रोजी तामिळ आणि हिंदीमध्ये रिलीज होणार आहे. आता पृथ्वीराज, मेजर आणि विक्रम यापैकी कोणता चित्रपट प्रेक्षकांना अधिक पाहायला आवडेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.