सीबीएसई प्रथम टर्मचा निकाल जाहीर

दुसऱ्या टर्मची दहावीची परीक्षा २६ एप्रिलपासून

|
13th March 2022, 12:33 Hrs
सीबीएसई प्रथम टर्मचा निकाल जाहीर

नवी दिल्ली : सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने (सीबीएसई) इयत्ता दहावीच्या प्रथम टर्मच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. यावेळी बोर्डाने अधिकृत वेबसाईटवर निकाल जाहीर करण्याऐवजी शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे निकाल आणि स्कोअरकार्ड मेल केले आहे. सर्व विद्यार्थी त्यांच्या शाळेत सीबीएसई इयत्ता दहावी टर्म १चा निकाल पाहू शकतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बोर्डाकडून अधिकृत वेबसाइट cbseresults.nic.in वर देखील निकाल जाहीर केला जाऊ शकतो.            

बोर्डाने नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२१ मध्ये पहिली टर्म परीक्षा घेतली होती. असे पहिल्यांदाच होत आहे की बोर्डाची परीक्षा दोन टप्प्यांत घेतली जात आहे. अधिकृत माहितीनुसार, सीबीएसई दहावी टर्म २ परीक्षा २६ एप्रिल २०२२ पासून सुरू होईल आणि २४ मे २०२२ रोजी संपेल. बारावी टर्म २ च्या परीक्षा २६ एप्रिलपासून सुरू होतील आणि १५ जून २०२२ रोजी संपतील. त्यानंतर अंतिम निकाल जाहीर केला जाईल.