अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी संशयित ताब्यात


21st January 2022, 11:53 pm
अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी संशयित ताब्यात

प्रतिनिधी। गोवन वार्ता

वास्को : गांजास्वरूप पदार्थ बाळगल्याप्रकरणी वास्को पोलिसांनी सुमीत संजय कुंजन (१९) या संशयिताला मध्यरात्री वरुणपुरी मांगोरहिल चौक येथे अटक केली. त्याच्याविरोधात अमली औषधे व अमली पदार्थ अधिनियम १९८५ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला. त्याच्याकडील ५९० ग्रॅम वजनाचा हिरवट पानांचा गांजा स्वरुप पदार्थ ताब्यात घेण्यात आला. त्या पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सुमारे ५१ हजार रुपये किंमत होते.

वास्को पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील नाईक हे वरुणपुरी मांगोरहिल चौकात बंदोबस्तासाठी होते. मध्यरात्री १ वाजता एक युवक स्कूटरने जात असल्याचे पाहून त्यांनी त्याला थांबविले. त्याच्याकडे चौकशी करण्यात आली. त्याच्या स्कूटरची तपासणी करण्यात आली तेव्हा डिकीमध्ये एक काळी पॉलिथिन पिशवी सापडली. त्यामध्ये हिरवट पानांचा गांजा स्वरुप पदार्थ असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे तो पदार्थ ताब्यात घेण्यात आला. 

सर्व कायदेशीर सोपस्कारा पूर्ण करून नंतर त्याला अटक करण्यात आली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गणेश माटोणकर पुढील तपास करीत आहेत. सुमीत कुंजन हा मुंडवेल वास्को येथील एका इमारतीमध्ये राहतो.