निवडणुकीतील अपराजित राजा

Story: गणेश जावडेकर |
20th January 2022, 11:31 pm
निवडणुकीतील अपराजित राजायंदाची विधानसभा निवडणूक थोडीशी वेगळीच असणार आहे. या निवडणुकीवर करोनाचे सावट असल्याने प्रचारासाठी राष्ट्रीय नेत्यांच्या जाहीर सभा होण्याची शक्यता कमीच आहे. तसेच मतदान केंद्रांवर तापमान मोजमाप यंत्रासह सेनिटायझरची व्यवस्था असणार आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे गोव्याचे विकासपुरूष व सर्वांचे लाडके मनोहरभाई यांची या निवडणुकीत उणीव भासेल. मागच्या म्हणजेच २०१७ सालच्या विधानसभा निवडणुकीत मनोहरभाई विधानसभा निवडणुकीत उमेदवार नव्हते.  ते केंद्रांत संरक्षणमंत्री होते. तरी पक्षासाठी त्यांनी राज्यात प्रचार केला होता. यावेळी दुर्दैवाने ते हयात नाहीत. १९९४ नंतर राज्यात जेवड्या निवडणुका झालेल्या आहेत, त्या सर्व निवडणुकांमध्ये मनोहर भाईंचा मोठा सहभाग राहिलेला आहे. यंदाच्या निवडणुकीचे आणखी एक वेगळेपण म्हणजे पर्ये मतदारसंघातून सतत निवडून येणारे माजी मुख्यमंत्री तसेच ‘सीनियर राणे’ यावेळी निवडणूक लढविणार नाहीत. प्रतापसिंग राणे यांचा निवडणूक प्रचारात पर्रीकर यांच्याएवढा दबदबा नसायचा, तरी काँग्रेसचे ते एक ज्येष्ठ नेते आहेत. यंदा ते निवडणूक लढविण्याची शक्यता जवळजवळ संपुष्टात आलेली आहे.

माजी मुख्यमंत्री, माजी सभापती, माजी विरोधी पक्षनेते प्रतापसिंग राणे हे एकाही विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले नाहीत. निवडणुकीतील हा ‘अपराजित योद्धा’ यंदाच्या निवडणूक युद्धात असणार नाही. तब्बल पन्नास वर्षे गोवा विधानसभेचा सदस्य असणारा हा अवलिया या पुढे सदस्य असणार नाही. पहिले मुख्यमंंत्री स्वर्गीय भाउसाहेब बांंदोडकर यांंनी खाशेना राजकारणात आणले. १९७२ सालची विधानसभा निवडणूक सत्तरी मतदारसंंघातून त्यांंनी जिंंकली. मगोनेच त्यांंना उमेदवारी दिली होती. पहिल्यांंदाच आमदार बनल्यानंंतर बांंदोडकर सरकारात ते मंंत्री होते. तद्नंंतर १९७७ सालची निवडणूक त्यांंनी काँग्रेसच्या उमेदवारीवर लढवली होती. या निवडणुकीत पहिल्यांंदाच काँग्रेसला दहा जागा मिळाल्या होत्या. यात खाशेंंचा समावेश होता. तद्नंंतर मगो पक्षात झालेल्या बंंडामुळे राज्यात बऱ्याच उलथापालथी झाल्या. १९८० साली पुन्हा विधानसभा निवडणूक झाली आणि खाशे तिसऱ्यांंदा सत्तरी मतदारसंंघातून निवडून आले. स्व. अनंंत नरसिंंह नायक आणी डॉ. विल्फ्रेड डिसोझा यांंच्या पाठिंंब्यामुळे ते गोव्याचे तत्कालिन मुख्यमंंत्री झाले. १६ जानेवारी १९८० या दिवशी खाशेंं सर्वप्रथम गोव्याचे मुख्यमंंत्री झाले. राज्यातील काँग्रेस सरकाराचे पहिले मुख्यमंंत्री बनण्याचा मान त्यांनाच मिळाला. २७ मार्च १९९० म्हणजे सलग दहा वर्षांपेक्षा अधिक काळ ते मुख्यमंंत्री होते. त्यांंच्याच कारकिर्दींत काँग्रेसने १९८४ व १९८९ सालच्या विधानसभा निवडणुका जिंंकलेल्या आहेत. ते मुख्यमंंत्री असतानाच ३० मे १९८७ या दिवशी गोव्याला घटक राज्याचा दर्जा मिळाला. त्यापूर्वी कोकणीला राजभाषेचा दर्जा मिळाला. १९८४ साली तत्कालीन प्रधानमंंत्री इंंदिरा गांंधी यांंची दुर्दैवी हत्या झाली. यामुळ निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या लाटेचा लाभ गोव्यातही काँग्रेसला झाला. १९८९ साली राज्यात काँग्रेसविरोधी लाट होती. तरीसुद्धा काँग्रेस पक्षाला काठावरचे बहुमत मिळाले आणि मुख्यमंंत्रिपदी राणे कायम राहिले.
काँग्रेसच्या सात आमदारांंनी फुटून वेगळा गट स्थापन केला आणि राणेंंचे सरकार कोसळले. त्यांंच्याविरुद्ध झालेले हे पहिले बंंड होते.प्रतापसिंंग राणे यांंचे सरकार कोसळल्यानंंतर राज्यात राजकीय अस्थैर्याचे पर्व सुरू झाले. १९९४ च्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे राणे पर्ये मतदारसंंघातून निवडून आले. तत्कालीन प्रधानमंंत्री नरसिंहराव यांंच्या पाठिंब्याने पुन्हा ते राज्याचे मुख्यमंंत्री बनले. १६ डिसेंंबर १९९४ ते २९ जुलै १९९८ पर्यंत ते मुख्यमंंत्री होते. डॉ. विल्फ्रेड डिसोझा यांंच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या दहा आमदारांंनी बंंड केल्यामुळे त्यांंचे सरकार कोसळले. राणे यांंच्या विरोधातले हे दुसरे बंंड होते. यानंंतर १९९९ आणि २००२ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांंनी विजय मिळविला.
मनोहर पर्रीकर यांंचे सरकार कोसळल्यानंंतर ३ फेब्रुवारी २००५ या दिवशी राणे यांंचा मुख्यमंंत्री म्हणून शपथविधी झाला. ४ मार्च २००५ पर्यंत ते मुख्यमंंत्री होते. तदनंंतर राष्ट्रपती राजवट लागू झाली. पोटनिवडणुकीत काँग्रेसला विजय मिळाल्यानंंतर ७ जून २००५ रोजी ते पुन्हा मुख्यमंंत्री झाले. ७ जून २००७ पर्यंत ते मुख्यमंंत्री होते. त्यानंंतर ते पुन्हा मुख्यमंंत्री झाले नाहीत. २००७, २०१२ आणि २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत पर्ये मतदारसंंघातून ते अपेक्षेप्रमाणे विजयी झाले. आता ते राजकारणातूनच निवृत्त झाले आहेत, असे म्हणायला हरकत नाही.


बंंडामुळे दोन वेळा मुख्यमंंत्रिपद गेले


- डॉ. लुईस प्रोत बार्बोझा, चर्चिल आलेमाव, जे. बी. गोन्साल्विस, सोमनाथ जुवारकार, मॉविन गुदिन्हो, लुइस अलेक्स कार्दाज आनी फॅरेल फुर्तादो या सात आमदारांंनी काँग्रेसमधून फुटून ‘गोवन पीपल्स पार्टी’ हा पक्ष स्थापन केल्याने सर्वप्रथम २७ मार्च १९९० रोजी प्रतापसिंंग राणेंंना मुख्यमंंत्रिपद सोडावे लागले होते. 


- नंंतर डॉ. विल्फ्रेड डिसोझा यांंच्या नेतृत्वाखाली दहा आमदारांंनी बंंड करून ‘गोवा राजीव काँग्रेस’ पक्ष स्थापन केलो होता. यामुळे २९ जुलै १९९८ रोजी त्यांंना पुन्हा मुख्यमंंत्रिपद सोडावे लागले होते. डॉ. विल्फ्रेड डिसोझा, दयानंंद नार्वेकर, सुभाष शिरोडकर, फातिमा डिसा, चंंद्रकांंत चोडणकर, पांंडु वासु नाईक, पांंडुरंंग भटाळे, जगदीश आचार्य, कार्मो पेगादो यांंनी काँग्रेस पक्ष सोडला होता.