सिनेमासृष्टीत ओटीटी प्लॅटफॉर्मची धमाल


20th January 2022, 09:21 pm
सिनेमासृष्टीत ओटीटी प्लॅटफॉर्मची धमाल

ओटीटी प्लॅटफॉर्मने लोकांचे चांगलेच मनोरंजन केले आणि वेब सीरिज बनवणाऱ्या, मुव्ही मेकरने त्यांच्या सर्व वेब सीरिज आणि सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यास सुरुवात केली, ज्यामुळे त्यांना भरपूर नफा झाला. आज अशाच काही वेब सीरिज आणि सिनेमांवर नजर टाकुया. काही दिवसात ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहेत, किंवा रिलीज केले आहेत.
करोना काळात ओटीटीची साथ
२०२० मध्ये जेव्हा करोना व्हायरसची प्रकरणे वाढू लागली आणि सरकारने सर्वत्र लॉकडाऊन घोषित केले, त्यामुळे सर्व चित्रपटगृहे बंद झाली आणि लोक घरात कैद झाले. तेव्हा त्यांच्यासमोर मनोरंजनाचे एकच साधन होते. ते अमेझॉन प्राईम व्हिडिओ, नेटफ्लिक्स, डिस्ने प्लास हॉटस्टार, व्हीओडी, एमएक्स प्लेअर सारखे ओटीटी प्लॅटफॉर्म होते.
१) अखंडा :
हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर लोकांनी पाहिला आहे. त्याने चांगली कमाई केली आणि सुपरहिट चित्रपटांमध्ये त्याचे नाव समाविष्ट केले. हा चित्रपट एक तेलुगू भाषेतील चित्रपट होता जो हिंदीत डब करून प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट २१ जानेवारी रोजी ओटीटीवर प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टार वर संध्याकाळी ६ वाजता प्रदर्शित होत आहेत. या चित्रपटाने एकूण १३० कोटींचे कलेक्शन केले.
२) ब्रो डॅडी :
ब्रो डॅडी हा मल्याळम भाषेतील चित्रपट होता. ज्याचा ट्रेलर रिलीज झाला आहे आणि प्रेक्षकांना त्याचा ट्रेलर खूप आवडला आहे. हा चित्रपट २६ जानेवारी रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर हिंदीमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात मोहनलाल आणि पृथ्वीलाल सुकुमारन मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट एका कुटुंबावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे. यात कल्याणी प्रियदर्शनही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
३) रोहित शेट्टीसोबत ‘मिशन फ्रंटलाइन’ :
ही एक वास्तविक आधारित वेब सीरिज आहे जी २० जानेवारी रोजी डिस्कव्हरी आणि डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाली आहे. यात रोहित शेट्टी हा प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक आहे. या मालिकेत जो एक संपूर्ण दिवस उत्तर भारतातील पर्वतांमध्ये तिथल्या स्पेशल फोर्ससोबत घालवणार असून खऱ्या मोहिमेवर जाणार असून गुन्हेगारांनाही पकडणार आहे.
४) मून नाईट :
हा चित्रपट मार्बल्स मालिकेतील एक नवीन सुपरहिरोची ओळख करून देणारा चित्रपट आहे. यात चंद्राच्या शक्तींशी संबंधित असलेल्या एका माणसाची कथा आहे, ज्याला तो कधी जागा होतो आणि कधी झोपतो हे समजत नाही. त्याच्या शरीरात तीन जीव आहेत, ज्यामुळे तो नेहमी गोंधळलेला असतो. मून नाइट या चित्रपटाचा सुपरहिरो अमेरिकन सैन्यात सेवा बजावलेला तरुण आहे.
५) मिडनाईट आशिया : (याला फोटो नाही)
ही एक माहितीपट मालिका आहे ज्यामध्ये आशिया आणि देशातील मोठ्या ठिकाणांचे रात्रीचे दृश्य आणि रात्रीचे जीवन याबद्दल दाखवले जाईल. तुम्ही ही वेब सीरिज प्रसिद्ध देशांच्या नाइटलाइफला घरी बसून पाहू शकता. ही मालिका नेटफ्लिक्सवर २० जानेवारीला हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये रिलीज झाली आहे.
६) ३६ फार्महाऊस :
सुभाष घई ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहेत. त्यांच्या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत बनलेला ३६ फार्महाऊस हा चित्रपट २१ जानेवारी रोजी झी-५ वर प्रदर्शित होत आहे. या मालिकेत विजय राज, संजय मिश्रा, बरखा सिंग, अमोल पराशर यांच्यासह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत.
७) अनपोझ्ड : नवीन प्रवास
श्रेया धन्वंतरीची अनपोझ्ड ही वेब सीरिज अमेझॉन प्राइमवर रिलीज होणार आहे. या वेब सीरिजमध्ये पाच लघुपट दाखवले जाणार आहेत. ज्यामध्ये लोक वेगवेगळ्या प्रकारच्या आव्हानांचा सामना करताना दिसणार आहेत. ही आव्हाने अशी आहेत ज्यांना साथीच्या आजारात लोकांना सामोरे जावे लागले आहे. ही वेब सीरिज २१ जानेवारीला रिलीज होणार आहे.