ओमिक्रॉनच्या पाच संशयितांपैकी एकात आढळली लक्षणे!


08th December 2021, 12:34 am
ओमिक्रॉनच्या पाच संशयितांपैकी एकात आढळली लक्षणे!

प्रतिनिधी। गोवन वार्ता      

पणजी : राज्यात आढळलेल्या पाच ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या संशयितांपैकी चौघांमध्ये लक्षण नाहीत. तर एकामध्ये लक्षणे आढळली आहेत पण त्याची प्रकृती चांगली असून त्याला ऑक्सिजनवर ठेवण्यात आलेले नाही, अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी सोशल मीडियाद्वारे दिली आहे.      

जहाजातून गोव्यात आलेल्या पाच रशियन प्रवाशांना कोविडच्या ओमिक्रॉन  व्हेरिएंटची लागण झाल्याचा संशय होता. या पाचही जणांचे नमुने चाचणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. त्या पाचपैकी चौघांमध्ये लक्षणे दिसत नाहीत. पण, एका संशयितात लक्षणे दिसत आहेत पण त्याची प्रकृती उत्तम असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी म्हटले आहे. दरम्यान, केपटाऊन येथून ३१ ऑक्टोबर रोजी निघालेल्या जहाजातून काही रशियन प्रवासी गोव्यात आले होते. २९ नोव्हेंबर रोजी त्यांतील एकात प्रथम कोविडची लक्षणे दिसून आली. त्यानंतर जहाजातील २१ प्रवाशांची चाचणी करण्यात आली होती. त्यांतील काहींचे अहवाल बा​धित आले. पण, त्यांतील पाच जणांचा २१ नोव्हेंबर रोजी रशियाशी संपर्क आला होता. त्यामुळे त्या पाच जणांना ओमिक्रॉन व्हेरिएंटची लागण झाल्याचा संशय आहे. पाचपैकी तिघांचे कासावली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात विलगीकरण करण्यात आले होते. तर इतरांना जहाजातच ठेवण्यात आले होते.