पं. वामनराव पिळगावकर संगीत समारोह ४ व ५ रोजी

|
30th November 2021, 10:52 Hrs
पं. वामनराव पिळगावकर संगीत समारोह ४ व ५ रोजी

पत्रकार परिषदेत माहिती देताना गणेश पार्सेकर व इतर.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पेडणे :
पंडित वामनराव पिळगावकर शिष्य व हितचिंतक परिवारातर्फे आणि गोवा पर्यटन खाते श्री देवी माऊली शांतादुर्गा देवस्थान वारखंड - पेडणे यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार ४ व रविवार ५ डिसेंबर असे दोन दिवस वारखंड येथील श्री शांतादुर्गा देवस्थान येथे आयोजित केल्याची माहिती पं. वामनराव पिळगावकर शिष्य परिवारातर्फे पेडणे भगवती हायस्कूल येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी पत्रकार परिषदेला आयोजन समितीचे अध्यक्ष गणेश पार्सेकर, उपाध्यक्ष पांडुरंग राऊळ, श्री माऊली देवस्थान समितीचे अध्यक्ष हनुमान परब, महाबळेश्वर च्यारी, गोरख मांद्रेकर, वासुदेव परब व संदीप कामुलकर आदी उपस्थित होते.
शनिवार ४ डिसेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता शांतादुर्गा भजनी मंडळ धारगळ ‘भजन सध्या’ कार्यक्रम सादर करणार आहे. संध्याकाळी ४.३० वाजता उद्घाटन व सत्कार सोहळा होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक शिवाय विशेष निमंत्रित म्हणून मोहनदास पोळे, तुळशीदास गावस, जिल्हा पंचायत सदस्य सीमा खडपे, पंच सदस्य मनोहर धारगळकर, देवस्थानचे अध्यक्ष हनुमंत परब, ज्ञानेश्वर परब, मुकुंद परब, बाबलो परब, सरपंच संजय तुळसकर उपस्थित असणार आहेत. यावेळी ​गायक, वादक, नाट्य कलाकारांचा सन्मान होणार आहे.
रविवार ५ रोजी सकाळी ९.३० वाजता गायनाची मैफल होईल. सकाळी ११ वाजता ओंकार शेटगावकर यांचे हार्मोनियम सोलो, सकाळी ११.३० वाजता मृदुला तांबे पुणे यांचे शास्त्रीय गायन, दुपारी ३ वाजता गोविंद मराठे, प्रकाश काकतकर, प्रल्हाद गावस, विठ्ठल शिरोडकर, सुनील दिवकर, गणेश पार्सेकर, महाबळेश्वर च्यारी, पांडुरंग राऊळ व मोहनदास पोळे यांचे गायन, संध्याकाळी ५ वाजता महेश सावंत पखवाज, अतुल उमळकर तबला, दत्तप्रसाद खडपकर ढोलकी, अमित उमाळकर नगमा साथ असा बहुरंगी संगीत वाद्यांचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर संध्याकाळी ५.३० वाजता प. महेश सारमंडळी यांचे शास्त्रीय गायन, त्याना दत्तराज सुर्लकर, रोहिदास परब, निशांत पिळगावकर, शिवानंद दाभोलकर, विलास शेट्ये, शेखर नागडे, निलेश गोवेकर, निशिकांत कलंगुटकर, प्रसाद कलंगुटकर, नितीन शिरगावकर, राजू कोलवाळकर, गोविंद नाईक हे संगीत साथ करतील.