कोलवाळ भागात भंगार अड्ड्यांवर कारावाई सुरूच

|
30th November 2021, 10:49 Hrs
कोलवाळ भागात भंगार अड्ड्यांवर कारावाई सुरूच

गोटणीचोव्हाळ - कोलवाळ येथे बेकायदा भंगार अड्डा जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त करताना अतिक्रमण हटाव पथक.

प्रतिनिधी। गोवन वार्ता
म्हापसा :
कोलवाळ पंचायतीने बेकायदा भंगार अड्ड्यावर कारवाईची मोहीम सुरूच ठेवली आहे. मंगळवारी गोटणीचोव्हाळ येथील महमद रफीक यांच्या मालकीचा भंगार अड्डा जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आला.
गेल्या शुक्रवारी कोलवाळ पंचायतीने पंचायत संचालनालयाच्या आदेशानुसार मुशीरवाडा - कोलवाळ येथे इरफान खान यांच्या भंगार अड्ड्यावर कारवाई करून तो अड्डा जमीनदोस्त केला होता. तसेच भंगार अड्ड्याविरुद्धच्या कारवाई मोहिमेस सुरुवात केली होती. या मोहिमेअंतर्गत मंगळवारी कोमुनिदादच्या जागेत सर्वे क्रमांक ११० १ मधील महमद रफीक यांचा अड्डा हटविला.
या अड्ड्याच्या मागील बाजूस बेकायदेशीररीत्या काँक्रिटच्या सहाय्याने पक्के बांधकाम केले होते. ते देखील अतिक्रमण हटाव पथकाने जमीनदोस्त केले.
सरपंच नित्यानंद कांदोळकर, सचिव प्रेमानंद मांद्रेकर, संयुक्त मामलेदार दुर्गा नाईक, गटविकास अधिकारी कार्यालयाचे अधिकारी यांनी कोलवाळ पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली.