र​शियात एकाच दिवसात ४० हजार करोनाबाधित

चीननंतर आता रशियाच्या राजधानीत देखील लॉकडाऊन

Story: मॉस्को : |
29th October 2021, 12:44 am
र​शियात एकाच दिवसात ४० हजार करोनाबाधित

मॉस्को : जग कोविडच्या संकटातून काहीसे सावरत असताना करोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. चीननंतर आता रशियाच्या राजधानीत देखील लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. रशियामध्ये एका दिवसात ४० हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. ही महामारी सुरू झाल्यापासूनची सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. त्याचबरोबर १,१५९ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी पुतिन सरकारने मॉस्कोमध्ये ११ दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.         

हेही वाचा