दानशूर व्यक्तींच्या यादीत अजीम प्रेमजी अव्वलस्थानी

विप्रो कंपनीचे सॉफ्टवेअर एक्सपोर्टर अजीम प्रेमजी यांनी आर्थिक वर्षे २०२१ मध्ये एकूण ९,७१३ कोटी रुपये म्हणजेच प्रति दिन २७ कोटी रुपये दान केले आहेत. दान देण्याच्या बाबतीत अजीम प्रेमजी अव्वलस्थानी आहेत.

Story: नवी दिल्ली : |
29th October 2021, 12:31 am
दानशूर व्यक्तींच्या यादीत अजीम प्रेमजी अव्वलस्थानी

नवी दिल्ली : विप्रो कंपनीचे सॉफ्टवेअर एक्सपोर्टर अजीम प्रेमजी यांनी आर्थिक वर्षे २०२१ मध्ये एकूण ९,७१३ कोटी रुपये म्हणजेच प्रति दिन २७ कोटी रुपये दान केले आहेत. दान देण्याच्या बाबतीत अजीम प्रेमजी अव्वलस्थानी आहेत. विप्रो कंपनीचे सर्वेसर्वा प्रेमजी यांनी कोविड महामारीच्या काळात आपल्या दान देण्याच्या रकमेत एक चतुर्थांश वाढ केली आहे.
एडेल्गीव्ह हर्न इंडिया फिलँट्रॉफी लीस्टनुसार सर्वाधिक दान देणाऱ्या दानशूर व्यक्तींच्या यादीत एचसीएल कंपनीचे शिव नादर हे दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यांनी एकूण १,२६३ कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. देशातील सर्वाधिक श्रीमंत असलेले रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी या यादीत तिसऱ्या स्थानावर आहेत. मुकेश अंबानी यांनी ५७७ कोटी रुपयांचे दान केले आहे. तर, कुमार मंगलम बिर्ला यांनी ३७७ कोटी रुपयांचे दान केले असून ते चौथ्या स्थानावर आहेत. गौतम अदानी यांनी आपत्ती फंडासाठी १३० कोटी रुपयांचा निधी दिला असून दानशूर व्यक्तींच्या यादीत ते आठव्या स्थानावर आहेत.
इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन निलकेणी यांच्या रँकिंगमध्ये सुधारणा झाली असून, १८३ कोटी रुपयांचे दान त्यांनी केले आहे.