झेवियर डिसोझाला कांस्यपदक


28th October 2021, 11:53 pm
झेवियर डिसोझाला कांस्यपदक

पणजी : गोव्याचा जलतरणपटू झेवियर डिसोझा याने ३७ व्या सब-ज्युनियर आणि ४७व्या ज्युनियर नॅशनल अॅक्वाटिक चॅम्पियनशिप २०२१ मध्ये चालू असलेल्या सिनियर नॅशनलमध्ये १०० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये ५८.९६ च्या वेळेसह कांस्यपदक मिळवले. या स्पर्धेचे आयोजन बंगळुरू येथे कर्नाटक स्विमिंग असोसिएशनने स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या सहकार्याने केले होते.
ऑलिम्पियन श्रीहरी नटराजने ५५.६३ चा स्वतःचा विक्रम मोडून ५५.१० चा नवा मीट रेकॉर्ड बनवून सुवर्णपदक जिंकले आणि शिवा एस. ने ५७.६० च्या वेळेसह रौप्य पदक जिंकून ही स्पर्धा अतिशय रोमांचक बनवली.
झेवियर डिसोझा सध्या बंगळुरूमधील ‘गॅफरी’ एक्वाटिक सेंटरमध्ये जलतरण प्रशिक्षक भूषण कुमार यांच्या टीमच्या अंतर्गत पूर्णवेळ नियमित प्रशिक्षण घेत आहे.