उपराष्ट्रपती आज गोव्यात

वाहतुकीच्या संदर्भात प्रशासनाच्या सूचना


26th October 2021, 11:49 pm
उपराष्ट्रपती आज गोव्यात

पणजी : उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू २७ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत राज्याच्या दौऱ्यावर येत आहेत. उपराष्ट्रपतींच्या वाहनांचो ताफा ज्या रस्त्याने ये-जा करणार आहे, त्या रस्त्याच्या बाजूला लोकांनी आपली वाहने पार्क करू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विविध ठिकाणी वाहतूक अगोदरच बंद केली जाईल.
२७ आणि ३० ऑक्टोबर रोजी आएनएस हंसा विमानतळ ते राजभवन (एअरपोर्ट जंक्शन, ग्रेड सेपरेटर, चिकली सर्कल, चिकली पंचायत, कुठ्ठाळी जंक्शन, आगशी जंक्शन, शिरदोण, गोमेकॉ बांबोळी, गोवा विद्यापीठ रस्ता, एनआयओ सर्कल ते राजभवन रस्ते) आणि २८ ऑक्टोबर रोजी राजभवन ते संत सोहिरोबानाथ आंबिये सरकारी महाविद्यालय विनोर्डा-पेडणे (एनआयओ सर्कल, सुकुर जंक्शन, ग्रीन पार्क जंक्शन, करासवाडो उड्डाण पूल, कोलवाळ पूल, धारगळ टोल नाका, कुळण उड्डाण पूल, रेडकर हॉस्पिटल, संत सोहिरोबानाथ आंबिये सरकारी महाविद्यालय, विनोर्डा-पेडणे) असा अतिमहनीय व्यक्तींच्या प्रवासाचा मार्ग असेल. उपराष्ट्रपतींच्या भेटीदरम्यान जनतेने पोलिसांना सहकार्य करावे आणि वाहतूक नियमांचे पालन करावे. रस्त्याशेजारी सोडून दिलेले वाहन दिसल्यास ते ओढून बाजुला काढले जाईल. विमान प्रवास करणार्‍या प्रवाशांनी याची नोंद घेऊन त्यांच्या प्रवासाची वेळ ठरवावी, असे कळविण्यात आले आहे.