घुसखोरी, मारहाण प्रकरणी सर्वेश पार्सेकरला अटक

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
13th October 2021, 12:18 Hrs
घुसखोरी, मारहाण प्रकरणी सर्वेश पार्सेकरला अटक

म्हापसा ः आंगड म्हापसा येथे एका आस्थापनात घुसून मालकाला मारहाण व मोडतोड 

केल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी संशयित सर्वेश ऊर्फ भैय्या पार्सेकर (३०, आरासवाडा 

नागवा) यास अटक केली आहे.

हा प्रकार दि. ३ जून रोजी मध्यरात्री १.४५ च्या सुमारास घडला होता. या प्रकरणी 

आस्थापनाचे मालक राजू डांगी (मूळ रा. मुंबई) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

संशयित आरोपी सर्वेश ऊर्फ भैय्या पार्सेकर, राजेश ऊर्फ लुडू केरकर, सागर पाटील, 

स्वप्निल मसूरकर (सर्व रा. नागवा) व सागर शिरोडकर (रा. थिवी) यांनी वैयक्तिक 

वादातून फिर्यादींच्या आस्थापनात बेकायदेशीररीत्या घुसखोरी केली. त्यांना मारहाण केली. 

तसेच फ्रीज व इतर वस्तूंची मोडतोड करून १० हजारांचे नुकसान केले होते. या 

मारहाणीत फिर्यादी डांगी जखमी झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी संशयितांविरुद्ध 

भा.दं.सं.च्या १४३, १४७, ४५२, ५०४, ४२७, ३२३, ५०६(२) खाली गुन्हा नोंद केला 

होता. संशयित सर्वेश पार्सेकर यास वरील गुन्ह्यांखाली सोमवारी पकडून पोलिसांनी अटक 

केली. तर इतर संशयितांची अटकपूर्व जामिनावर सुटका करण्यात आली होती.